Garba In Train: मुंबई लोकल ट्रेनमध्ये महिलांनी खेळला मनसोक्त गरबा; सोशल मीडियावर VIDEO तुफान व्हायरल

Viral Video: गरबा खेळताना व्हिडीओ एका व्यक्तीने आपल्या फोनमध्ये कैद केला आहे.
Garba In Train
Garba In TrainSaam TV
Published On

Mumbai Local Train Viral Video:

मुंबई लोकल ट्रेन नेहमीच तिच्या विविध कारणांसाठी चर्चेत असते. मुंबई लोकलमध्ये फक्त भांडण नाही तर विविध सण उस्तव देखील आनंदाने साजरे केले जातात. सध्या नवरात्री सुरू आहे आणि मुंबई लोकल ट्रेनमध्ये हा सण देखील साजरा केल्याचं पाहायला मिळालय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Garba In Train
Viral Video: मैं झुकेगा नहीं.. शतक झळकावताच डेव्हिड वॉर्नरचं 'पुष्पा'स्टाईल सेलिब्रेशन; Video व्हायरल

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मुंबई लोकल ट्रेनमध्ये काही महिला साडी नेसून मस्त नटून आल्यात. रात्री गरबा खेळायला जाता येत नाही त्यामुळे या महिलांनी थेट ट्रेन मध्येच गरबा खेळायला सुरुवात केलीये. त्यांचा गरबा खेळताना व्हिडीओ एका व्यक्तीने आपल्या फोनमध्ये कैद केला आहे. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

मुंबई लोकल ट्रेन म्हणजे मुंबईकरांची जीवन वहिनी आहे. रोज कामावर जाण्यासाठी आणि तेथून घरी येण्यासाठी व्यक्ती लोकल ट्रेनचाच वापर करतात. महिलांच्या डब्ब्यात तर नेहमीच झिंझ्या पकडून महिलांची भांडणे पाहायला मिळतात. मात्र कितीही धावपळ आणि धकाधकीचे जीवन असले तरी मुंबई लोकलमध्ये महिलांनी आपली संस्कृती जपल्याचं पाहायला मिळतंय.

महिलांच्या गरब्याचा हा व्हिडीओ @HarshKawade या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी यावर मजेशीर कमेंट केल्यात. आम्हाला सुद्धा ट्रेनमध्ये गरबा खेळायचा आहे, असं एका महिलेने कमेंटमध्ये लिहिलं आहे. ट्रेनमध्ये माल डब्ब्यात बरीच जागा असते. त्यामुळे या महिलांनी गरबा खेळण्यासाठी या डब्ब्यांची निवड केलीये.

महिलांचा अनोखा गरबा पाहून ट्रेनमधील इतर प्रवासी देखील चकित झालेत. त्यानंतर अनेक महिलांनी या गरब्याचा आनंद लुटलाय. मुंबई लोकल ट्रेनमध्ये दसरऱ्या निमित्त झगमगाट करण्यात आलीये. ट्रेनमध्ये फुलांच्या माळा आणि पताका लावण्यात आल्यात. दसऱ्याचा सण अनेक चाकरमान्यांनी मुंबई लोकल ट्रेनमध्ये साजरा केलाय.

Garba In Train
Alibag Crime News : दोन्ही बहिणींना सुपमध्ये विष टाकून केली हत्या; मालमत्तेच्या हव्यासातून भावाचे कृत्य

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com