Viral Video : कुणी तरी येणार गं! गरोदर मैत्रिणीसाठी लोकलमध्ये ठेवलं डोहाळे जेवण, Video पाहून म्हणाल...

Mumbai Local Train baby shower Viral Video : मुंबई लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांनी गरोदर मैत्रिणीचा ट्रेनमध्येच डोहाळे जेवण साजरे केले. फुगे, तोरणे आणि ओटीभरणीच्या कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Viral Video : कुणी तरी येणार गं!  गरोदर मैत्रिणीसाठी लोकलमध्ये ठेवलं डोहाळे जेवण, Video पाहून म्हणाल...
Mumbai Local Train Viral VideoSaam Tv
Published On
Summary
  • मुंबई लोकलमध्ये महिलांनी गरोदर सहप्रवाशीसाठी डोहाळे जेवण साजरे केले

  • ट्रेनमध्ये फुगे-तोरणांनी सजावट करून पारंपरिक ओटीभरणी केली

  • व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

  • लोकल प्रवासात नव्या ट्रेंडची चर्चा सुरू

मुंबई लोकलमध्ये प्रवास भांडण, धक्काबुकी यासारख्या घटना घडताना आपण पहिल्या आहेत. त्याचबरोबर लोकलच्या प्रवासादरम्यान सकाळच्या सुमारास प्रवासी टाळाच्या गजरात तल्लीन होऊन, भजनात दंग होऊन प्रवास करतात. या भजनांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. याशिवाय लग्नाच्या केळवणाचे देखील व्हिडिओ आपल्याला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळतात. मात्र आता एक नवीन ट्रेंड पाहायला मिळत आहे. लोकलमध्ये महिलांनी चक्क डोहाळे जेवण साजरा केलं आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, लोकल ट्रेनमधून नेहमी प्रवास करत असलेल्या महिलांच्या एका ग्रुपने एका गरोदर महिलेचे डोहाळे जेवण करून तिचे लाड पुरवले आहेत. ज्या प्रकारे कुटुंबीय एकत्र येऊन घरगुती पद्धतीने डोहाळे जेवण साजरा करतात त्याच प्रकारे या महिलांच्या एका ग्रुपने डोहाळे जेवण साजरा केला आहे.

या महिलांनी ट्रेनमध्ये फुगे आणि तोरणांनी सजावट केलेली पाहायला मिळत आहे. शिवाय सगळ्या महिलांनी मिळून गरोदर महिलेची पाच फळांनी ओटी भरून एक गिफ्ट सुद्धा दिल आहे. हा व्हिडिओ divyakadam10 या इंस्टाग्राम आयडीवरून व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com