Mumbai Local Train Stunt: धावत्या रेल्वेतून तरुणाने मारली उडी...; स्टंटबाजीचा VIDEO पाहून तुमच्याही काळजाचा थरकाप उडेल

Boy Jump From Running Train: मुंबई लोकल आतापर्यंत स्टंटबाजी आणि हाणामारीसाठीच चर्चेत आली आहे.
Mumbai Local Train Stunt
Mumbai Local Train StuntSaam TV

Local Train Stunt:

मुंबई लोकल ट्रेनमधून रोज हजारो प्रवाशी प्रवास करतात. या प्रवासादरम्यान अनेकांची जोरदार भांडणे होतात. मुंबई लोकल आतापर्यंत स्टंटबाजी आणि हाणामारीसाठीच चर्चेत आली आहे. आता देखील मुंबई लोकल ट्रेनमधून एक स्टंटबाजीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. (Latest Marathi News)

व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण ट्रेनमधून प्रवास करत आहे. प्रवास करताना तो धावत्या ट्रेनमधून स्टंटबाजी करत खाली उतरतोय. तरुणाचा हा स्टंट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओपाहून नेटकरी देखील यावर संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.

Mumbai Local Train Stunt
MHJ Fame Actor Viral Video: बाल्ड लूक अन् सेम टू सेम डान्स... ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याला ‘जवान’ची भूरळ; VIDEO व्हायरल

व्हिडीओमध्ये तुम्हीही पाहू शकता की, तरूण ट्रेनला जोडून असलेल्या पायऱ्यांवर उभा राहिला आहे. या पायऱ्यांवर उभे राहत तो ट्रेन फलाटापर्यंत पोहचण्याआधीच त्यातून उडी मारतो. तरुण खाली पडताच त्याला बराच मार लागला असावा अशी शंका अनेकांच्या मनात येते. सुदैवाने या तरुणाला कोणतीही दुखापत होत नाही.

लोकल ट्रेन फलाटावर आल्यानंतर देखील ट्रेन स्लो होऊन धावत असताना अनेक जण धावती ट्रेन सोडतात. दरवाजावर उभे राहतात. अशा पद्धतीने प्रवास करताना मोठे अपघात घडतात. या अपघातात आतापर्यंत अनेकांनी आपला जीव गमावला आहे.

Mumbai Local Train Stunt
Talathi Viral Video: दारु पिऊन कार्यालयात आला, सातबाऱ्यावर सही करताना खुर्चीवरुन पडला; मद्यधुंद तलाठ्याचा VIDEO

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ कुर्ला-मानखुर्द दरम्यानचा आहे. @Jaswant55804218 या ट्वीटर अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. जसवंत सिंग यांनी हा व्हिडीओ पोस्ट करत सदर तरुणावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com