CSMT Passengers Dance Video: सीएसएमटी रेल्वे स्टेशनवर अचानक सर्वजण नाचू लागले; नेमकं काय घडलं? चकित करणारं कारण आलं समोर

Dance Video Viral: मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनर्स या रेल्वे स्थानकावर प्रवाशी अचानक नाचू लागले.
CSMT Passengers Dance Video
CSMT Passengers Dance VideoSaam TV
Published On

Passengers Dance Video Viral:

मुंबई लोकल ट्रेन आणि विविध स्थानकांवरील आजवर अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. अशात सध्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या रेल्वे स्थानकावर प्रवाशी अचानक नाचू लागले. त्यांचा व्हिडीओ देखील तुफान व्हायरल झाला आहे. (Latest Viral Video)

व्हायरल व्हिडीओमध्ये तु्म्ही पाहू शकता की, रेल्वेस्थानकावर सर्व प्रवाशी आनंद व्यक्त करत नाचत आहेत. नाचणाऱ्यांचा हा जल्लोष एका मोटारमनच्या सेवानिवृत्तीसाठीचा आहे. गेल्या आठवड्यात एका मोटरमनने त्याच्या निवृत्तीच्या दिवशी शेवटची लोकल ट्रेन चालवली होती. तेव्हा प्रवाशांनी अशा पद्धतीने आपला आनंद व्यक्त केला.

CSMT Passengers Dance Video
Girls Fighting Viral Video: प्रेमासाठी 'दे दणादण'! कॉलेजच्या आवारात दोघी भिडल्या... लाथा बुक्क्यांची तुफान बरसात; व्हिडिओ व्हायरल

@mumbairailusers या इंस्टाअकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट्स केल्यात. मुंबई लोकल ट्रेन नेहमीच चर्चेचा विषय असते. अनेकदा या ट्रेनमध्ये महिलांची किंवा पुरुषांची बेदम भांडणं सुरु असल्याच्या व्हिडीओ पाहायला मिळतात.

रेल्वेचा (Train) प्रवास म्हटलं की, मोठी गर्दी आणि दगदग असते. अशा धकाधकीच्या जिवनात चाकरमानी रोज प्रवास करतात. त्यामुळे प्रेमाने प्रवास करण्याऐवजी अनेकदा व्यक्ती एकमेकांशी शुल्लक कारणावरून वाद करतात. वाद वाढला की त्याचं हाणामारीत रुपांतर होतं. अशा परिस्थितीत रेल्वे स्थानकांवर अशा पद्धतीचा जल्लोष पाहून नेटकऱ्यांनीही यावर सकारात्मक कमेंट केल्यात.

CSMT Passengers Dance Video
Red Rose Bhajiya: गुलाबाच्या फुलांची चक्क भजी बनवली? रेसिपीचा VIDEO सोशल मीडियावर VIRAL

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com