
जिभेचे चोचले पुरवण्यासाठी व्यक्ती कायम नविन आणि विविध पदार्थ चाखतात. वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ खाण्यासाठी काही खवय्ये तर देश-विदेशांच्या वाऱ्या देखील करतात. नविन काहीतरी बनवायचं म्हणून आतापर्यंत चहा पाणीपुरी, अंडाभजी असे अनेक अतरंगी पदार्थांचे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. अशात आता चक्क गुलाबाच्या फुलाची रेसिपी व्हायरल झाली आहे. (Latest Marathi News)
गुलाबांच्या फुलांपासून भजी बनवतानाचा व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. एका महिलेने आपलं कुकींग स्कील दाखवत थेट फुलांचे भजी बनवलेत. गुलाबाचं फुल अनेक जण प्रेमाचं प्रतीक म्हणून एकमेकांना देतात. गुलाबफुलापासून गुलाबजल बनवलं जातं. तसेच गुलकंद देखील बनवतात. मात्र या महिलेने आता थेट गुलाब भजी बनवलेत. तिचे हे भजी पाहून नेटकरी चक्रावलेत.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता या महिलेने एका टोपात काही गुलाबाची फुलं घेतली आहेत. या फुलांना ती बेसनाच्या पिठात बुडवून मस्त तळून काढत आहे. तिची ही रेसिपी पाहून यानंतर भजी खावीत की नाही असा प्रश्न काही नेटकऱ्यांना पडला आहे.
@amee_kaushik_ribadiya या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केलाय. एकाने यावर कमेंट करत हा खोटा व्हिडीओ असल्याचं म्हटलं आहे. गुलाबजाममध्ये देखील गुलाब टाकत नाहीत आणि तू हे काय बनवलंस?, अशी कमेंट एकाने केली आहे. तर एका तरुणाने यावर लिहिलंय की, एक गुलाब दुसऱ्या गुलाबाला तळतंय. यासह अनेकांनी यावर हसण्याचे इमोजी देखील पाठवले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.