Mumbai Crime News: करिअरसाठी पार आंधळी झाली! बाळ रस्त्यावर टाकून आई नोकरीला पळाली; मुंबईमधील हृदय हेलावणारी घटना

Baby On Bhandup Road : प्रेमाला त्यांनी पती पत्नीचं नातं जोडत लग्न केलं. पुढे पैशांची गरज भासत होती.
Mumbai Crime News
Mumbai Crime NewsSaam TV
Published On

Bhandup News:

स्वप्नांची नगरी असलेल्या मुंबईत प्रत्येक जण नोकरीच्या शोधात येत असतो. तरुण- तरुणी आपलं पोट भरण्यासाठी मुंबईत नोकरी करतात आणि संसार थाटतात. अशात नोकरीसाठी एका आईने आपल्या बाळाला रस्त्यावर सोडून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Latest Marathi News)

दार्जिलिंगच्या २२ वर्षीय तरुणीची सिक्कीमच्या एका तरुणाशी ओळख झाली. दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. प्रेमाला त्यांनी पती पत्नीचं नातं जोडत लग्न केलं. पुढे पैशांची गरज भासत होती. त्यामुळे पती गावी आणि पत्नी नोकरीच्या शोधात मुंबईला आली आणि भांडूपमध्ये राहू लागली. एका हॉटेलात तिला नोकरीही मिळाली.

Mumbai Crime News
Rajasthan Pratapgarh Crime: गरोदर महिलेला निर्वस्त्र केलं, गावातून धिंड काढली; संतापजनक घटनेनं राजस्थान हादरलं

अशात काही दिवसांनी आपण गर्भवती असल्याचं तिला समजलं. नोकरी करताना बाळाला कसं संभाळणार? असा प्रश्न तिच्या मनात आला. पतीला याबाबत सांगितल्यावर त्याने बाळासाठी नकार दिला. मात्र नंतर पतीने तिला बाळाला जन्म दे असं सांगितलं. तरुणीने आपल्या बाळाला जन्म दिला. तिला मुलगी झाली.

नोकरी आणि बाळ (Baby) संभाळणं तिला फार कठीण जात होतं. ४ दिवसांपासून नोकरीवर जाता येत नव्हतं कारण बाळाला सांभाळण्यासाठी घरी कोणीच नव्हतं. नोकरी सोडून बाळाला संभाळणं तिच्यासाठी कठीण होतं. शेवटी या महिलेने निर्णय घेतला आणि आपल्या ४ दिवसांच्या बाळाला रस्त्यावर सोडून ती नोकरीवर गेली.

Mumbai Crime News
Kalyan Crime News: बायको सोडून गेल्यानं माथेफिरूने बस अडवून चालकावर कोयत्याने केला हल्ला; कल्याणमधील धक्कादायक घटना...

रस्त्यावर बाळाने रडत आक्रोश केला. त्याच्या रडण्याचा आवाज रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींनी ऐकला आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत सावित्रीबाई फुले रुग्णालयात बाळाला नेलं. तिथे त्याच्यावर उपचार सुरू असताना पोलिसांनी आपला तपास सुरू केला.

तपासात पोलिसांना बाळाजवळ असलेली एक बेडशीट मिळाली. या बेडशीटवर लाँड्रीचा टॅग होता. पोलिसांनी याच धाग्याच्या आधारे बाळाच्या आईला शोधलं. सुरुवातीला आईने हे बाळ माझं नाही असं म्हणत त्याला नाकारलं. मात्र नंतर तिने बाळाला जवळ घेतलं. महिलेच्या पतीने बाळ माझ्याकडे घेऊन ये असं तिला सांगितलं होतं. त्यामुळे आता ही २२ वर्षीय तरुणी आपल्या बाळाला पतीकडे घेऊन जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांकडून तिचे समुपदेशन देखील करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com