Rajasthan Pratapgarh Crime: गरोदर महिलेला निर्वस्त्र केलं, गावातून धिंड काढली; संतापजनक घटनेनं राजस्थान हादरलं

Rajasthan Pratapgarh Viral Video: पीडित महिला आणि आरोपी पती दोघेही आदिवासीबहुल भागात राहणारे आहेत.
Rajasthan Pratapgarh Crime
Rajasthan Pratapgarh Crimesaam tv
Published On

Rajasthan Pregnant Lady Case:

पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना राजस्थानमध्ये घडली आहे. गरोदर पत्नीला निर्वस्त्र करून गावात तिची धिंड काढली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण राज्यातून संताप व्यक्त होत आहे. या घटनेची स्वतः मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली असून, आरोपींना तात्काळ तुरुंगात टाकले जाईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या प्रतापगड जिल्ह्यातील एका गावात ही संतापजनक घटना घडली. ही घटना ४ ते ५ दिवसांपूर्वीची असल्याचं समजतंय. पीडित महिला आदिवासीबहुल भागात राहते.

Rajasthan Pratapgarh Crime
Dombivli Crime: विश्वासू नोकरानेच दिला धोका! दुकानातील पावणे १३ लाखांचे दागिने घेऊन फरार; असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात

पतीने आणि सासरच्या मंडळींनी पीडितेला बेदम मारहाण केली. ते इतक्यावरच थांबले नाहीत. त्यांनी तिला विवस्त्र केलं. गावातून तिची धिंड काढली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गावात पोहचून संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन आरोपींचा शोध सुरू केला आहे. संपूर्ण देशातून या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे.

Rajasthan Pratapgarh Crime
Pimpri Chinchwad Crime: जावयाची करामत..सासूकडून खंडणी उकळण्यासाठी धक्कादायक कृत्य

मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल

राज्याचे पोलीस महासंचालक उमेश मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी घडली. धारियावाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात हा प्रकार घडला. शुक्रवारी संध्याकाळी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघड झालाय. पोलीस अधीक्षक, पोलीस महानिरीक्षक आणि एसएचओ तात्काळ घटनास्थळी पोहोचले, अशी माहितीही त्यांनी दिली.

पीडित महिलेचे लग्न वर्षभरापूर्वी झाले होते. पण गावातीलच अन्य व्यक्तीसोबत ती राहत होती, असा आरोप पती आणि सासरच्या मंडळींनी केला. राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी निषेध व्यक्त करतानाच, आरोपींना शक्य तितक्या लवकर तुरुंगात टाकले जाईल, असे ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com