MS Dhoni viral Video
MS Dhoni viral VideoSaam tv

MS Dhoni Chocolate Viral Video: चॉकलेट परत दे! माहीने ऑटोग्राफ दिल्यानंतर चॉकलेट मागताच चाहता खुदकन हसला, नेमकं काय घडलं?

MS Dhoni Viral Video: महेंद्र सिंह धोनीचा ऑटोग्राफनंतर चाहत्याकडे चॉकलेट मागतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे

MS Dhoni Chocolate Video Viral on Social Media

भारताचा माजी क्रिकेटपटू महेंद्र सिंह धोनीचा जगभरात मोठा चाहता वर्ग आहे. चाहत्यांचा लाडका माही सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून सुट्टीचा आनंद घेत आहे. याच टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा ऑटोग्राफनंतर चाहत्याकडे चॉकलेट मागतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. धोनीचा हा व्हिडिओ चाहत्यांना प्रचंड भावला आहे. (Latest Marathi News)

महेंद्र सिंह धोनी हा आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट यशस्वी कर्णधार राहिला आहे. या वर्षीचा आयपीएल सिजन झाल्यानंतर धोनीच्या गुडघ्याची शस्रक्रिया झाली होती. धोनी सध्या आता तंदुरुस्त दिसत असून अमेरिकेत सुट्टीचा आनंद घेत आहे.

याचदरम्यान, धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओतील धोनीचा साधेपणा चाहत्यांना चांगला भावला आहे .

MS Dhoni viral Video
IND vs SL, Asia Cup 2023: नवखा वेलालागे चमकला ! पाकची धुलाई करणाऱ्या पाचही फलंदाजांचा एकट्यानेच काढला काटा

नेमकं काय घडलं?

अमेरिकेतील रस्त्यावर फिरत असताना अचानक एक चाहता धोनीजवळ आला. त्या चाहत्याने छोट्या बॅटवर धोनीकडे ऑटोग्राफ मागितला. त्यावेळी धोनीने पटकन ऑटोग्राफ दिला. त्यानंतर धोनीने चाहत्याकडील चॉकलेट बॉक्स मजेशीर अंदाजात मागितला. धोनीचा हाच व्हिडिओ चाहत्यांमध्ये चांगलाच चर्चेत आला आहे.

तत्पूर्वी, महेंद्र सिंह धोनीने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत गोल्फ खेळण्याच्याही आनंद लुटला. त्यांचे फोटोही प्रचंड व्हायरल झाले आहेत.

धोनीने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. निवृत्तीनंतर धोनी आता फक्त आयपीएलमधील सामन्यात खेळताना दिसतो.

धोनीची जादू आयपीएलमध्ये चालणार का?

आयएपीएलच्या १७ व्या सिजनमध्ये धोनी पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्सचं नेतृत्व करताना दिसणार आहे. धोनी शस्त्रक्रियेनंतर तंदुरुस्त दिसत आहे. मात्र, यंदाच्या आयपीएल सिजनमध्ये खेळण्याविषयी धोनी लवकरच निर्णय जाहीर करणार आहे.

MS Dhoni viral Video
Ravi Shastri On Virat Kohli: 'दुसरा सचिन होऊ शकणार नाही..',विराटच्या खेळीवर रवी शास्त्रींचं मोठं विधान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com