अरं देवा! म्हशीच्या शेणामुळे मालकाला भरावे लागले ९ हजार रुपये, काय आहे प्रकार?

Fine For Buffalo Dung: मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये एक म्हशीमुळे एका व्यक्तीला भुर्दंड बसलाय. म्हशीच्या शेणामुळे या व्यक्तीला पैसे भरावे लागले आहेत.
अरं देवा! म्हशीच्या शेणामुळे मालकाला भरावे लागले ९ हजार रुपये, काय आहे प्रकार?
Fine For Buffalo Dung
Published On

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एक व्यक्तीला म्हैस संभाळणं चांगलेच महागात पडले आहे. म्हशीच्या शेणामुळे या व्यक्तीला ९ हजार रुपयाचा दंड भरावा लागलाय. हा दंड येथील नगरपालिकेने वसूल केलाय. इतकेच नाही तर याआधीही येथील नगरपरिषदेने येथील म्हशी पाळणाऱ्या मालकांकडून दंड वसूल करण्यात आलाय.

काय आहे कारण?

ग्वाल्हेर येथील नगरपरिषदेकेडून स्वच्छता सर्वेक्षण अभियान राबवला जात आहे. या मोहिमेनुसार शहराच्या काही भागात काही पशू पालक त्यांच्या पशूंना रस्त्याच्या बाजुला बांधून ठेवतात. त्यामुळे रस्त्यावर पशू विष्ठा करत असतात त्यामुळे रस्ता अस्वच्छ होत असतो. याच कारणामुळे या व्यक्तीकडून दंड वसूल करण्यात आलाय.

नगर परिषदेकडून सार्वजनिक ठिकाणी पशूंना बांधण्यास मनाई करण्यात आलीय. तसे केले तर दंड वसूल करण्यात येईल अशा सूचना देखील येथील नगर पालिकेकडून देण्यात आल्या आहेत. दरम्यान गुरुवारी येथील सिरौल रस्त्याजवळ एक म्हैस दिसून आली आणि या म्हशीने विष्ठादेखील केली होती. त्यामुळे नगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हशीला ताब्यात घेतलं. त्यानंतर म्हशीचा मालक नंदकिशोर यांच्याकडून दंड वसूल केला.

अरं देवा! म्हशीच्या शेणामुळे मालकाला भरावे लागले ९ हजार रुपये, काय आहे प्रकार?
Mahad Viral News: महाडमध्ये भररस्त्यात रेड्याचा धुमाकूळ, अनेकांना शिंगावर उचलून फेकलं; लोक जीव मुठीत घेऊन पळाले, थरारक VIDEO

याआधीही येथील नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी काही पशू मालकांकडून दंड वसूल केलाय. म्हैस संभाळणाऱ्या एका व्यक्तीकडून नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी तब्बल १० हजार रुपयांचा दंड वसूल केला होता.दरम्यान ग्वाल्हेरच्या नगर परिषदेच्या पथकाने म्हैशींच्या मालकांपासून दंड वसूल करण्यासह अस्वच्छता करणाऱ्या व्यक्तींकडूनही दंड वसूल करण्यात आलाय.

शहरातील रस्त्यावर मोकाट जनावरे सोडणाऱ्या मालकांकडून दंड वसूल करण्यात येत आहे. शिवराज सिंह चौव्हान यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात हा निर्णय घेण्यात आलाय. चौव्हान यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा कायदा लागू करण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com