
मराठा आंदोलकांचे व्हिडिओ व्हायरल
आझाद मैदानात खेळले कुस्ती
कबड्डी, खो-खो अन् रस्सीखेच खेळतानाचे व्हिडिओ व्हायरल
मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहे. त्यांनी आझाद मैदानात आमरण उपोषण सुरु केले आहे. त्यांच्यासोबत हजारो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहे. गेल्या ४ दिवसांपासून मराठा आंदोलक मुंबईत आहेत. मुंबईत सीएसएसमटी रेल्वे स्थानक परिसरात मराठा आंदोलक राहत आहेत. दरम्यान, अनेक मराठा आंदोलकांनी रस्त्यावर कुस्ती, कबड्डी खेळली आहे. काही जणांनी तर आझाद मैदानात कुस्ती खेळली आहे. त्यांनी आझाद मैदानातच कुस्तीचा आखादा सुरु केला आहे. (Maratha Aarakshan Viral Video)
आझाद मैदानावर कुस्तीचा आखाडा (Azad Maindan Video)
आझाद मैदान आणि सीएसएमटी (CSMT) स्टेशनवरील मराठा आंदोलकांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओत मराठा आंदोलक आझाद मैदानात कुस्ती खेळताना दिसत आहे. दोन पैलवान मैदानात कुस्ती खेळत आहेत. त्यांच्या आजूबाजूला गोलाकार अनेक लोक उपस्थित आहेत. ते या कुस्तीचा आनंद घेताना दिसत आहे.
मराठा आंदोलकांनी खेळली कबड्डी, खो-खो (Maratha Andolan Video)
मराठा आंदोलकांनी सीएसएमटी स्टेशन परिसरात कबड्डी आणि खो-खो खेळला आहे. त्यांनी भररस्त्यात खो-खो खेळायला सुरुवात केली. त्यासाठी अनेकजण रस्त्यावर बसलेदेखील होते. तर अनेकांनी आझाद मैदानात कबड्डी खेळायला सुरुवात केली. याचसोबत रेल्वे स्थानकावर अनेकांनी रस्सीखेच खेळली. रस्सी धरुन अनेक मराठा आंदोलक तिथे उभे होते. याचाच व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
मराठा आंदोलक बॅरिगेट्सवर चढले
मराठा आंदोलकांनी पोलिसांच्या बॅरिगेट्सवरुन चढून घोषणाबाजी केली. हे लोक बॅरिगेट्सवर चढले आणि रस्त्याभर फिरत होते. मराठा आंदोलकांचे हे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. तसेच अनेक मराठा आंदोलकांनी सीएसएमटी स्थानकावर दहीहंडीदेखील खेळली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.