Viral Video: सापाच्या तोंडाला पकडले अन् फणा खाली लटकवला, व्हायरल VIDEO पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Viral Video Of Snake: एका व्यक्तीने सापासोबत असा अजब प्रयोग केला, जो पाहून तुम्ही थक्क व्हाल. कधीही न पाहिलेल्या या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ पाहून नक्की काय घडले ते जाणून घेऊया.
Viral Video
Viral Videosaam tv
Published On

सोशल मीडिया हा व्हायरल कंटेंटचा मंच बनला आहे, जिथे दररोज काही ना काही चर्चेत येते. लोक विविध व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करतात, त्यातील काही अनोखे व्हिडिओ लक्ष वेधून घेतात. इ्न्स्टाग्राम, फेसबुक किंवा इतर कोणत्याही प्लॅटफॉर्मवर पाहिल्यास, काहीतरी नवीन आणि वेगळे व्हायरल होत असल्याचे दिसते. सात दिवस आणि चोवीस तास, काहीतरी चर्चेत असतेच.

अशा आशयाच्या व्हिडिओंनी लोकांचे लक्ष वेधून घेतले असून ते पाहणे अनुभवाने भारावून टाकणारे ठरत आहे. सोशल मीडियावर सध्या एक अनोखा आणि धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीच्या गळ्यात साप गुंडाळलेला दिसतो. सापाने फणा पसरलेला असून, तो व्यक्ती सापाचा फणा पकडतो.

Viral Video
Viral Video: काय रे देवा... स्टंटबाजी आली अंगलट, धावत्या ट्रेनच्या दरवाज्यात स्टंट करायला गेली अन् धाडकन आपटली, पाहा VIDEO

हे पाहताच साप आपले तोंड उघडतो, आणि त्यानंतर तो व्यक्ती सापाच्या तोंडाचा वरचा भाग दातांनी पकडतो. आश्चर्य म्हणजे, त्याने सहज साप उचलला आणि नंतर त्याला खाली लटकवले. या व्हिडिओमधील धाडस आणि धक्कादायक क्षण लोकांना चकित करत आहेत. व्हिडिओ कोठे आणि केव्हा शूट करण्यात आला याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही, परंतु सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे.

Viral Video
Viral Video: माझा शर्ट सोड,नाहीतर आई ओरडेल! वाघासमोरही आईची दहशत; चिमूकल्याचा VIDEO एकदा पाहाच

इन्स्टाग्रामवर 'memesbysukhraj' नावाच्या अकाउंटवर पोस्ट केलेला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. बातमी लिहीपर्यंत या व्हिडिओला ७१ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले असून, अनेकांनी हा व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिले सर्पमित्रांचा इमरान हाश्मी. तर दुसऱ्या युजरने मजेशीर कमेंट करत लिहिले विषारी दात काढले असतील. आणखी एका व्यक्तीने लिहिले, हे विषारी नसतील, पण यासाठी प्रचंड धैर्य लागते. व्हिडिओमधील व्यक्तीचा धाडसपूर्ण खेळ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

Viral Video
Viral Video: बिबट्या दबक्या पावलांनी आला अन् सुसाट निघाला, रस्ता ओलांडताना दुचाकीला धडकला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com