स्ट्रीट फूड आवडत नाही अशी एकही व्यक्ती नाही. सध्या तरुणाईने स्ट्रीट फूडमध्ये मोमोजला जास्त पसंती दिली आहे. बाहेर मित्र मैत्रीणींसह फिरण्यासाठी गेल्यावर अनेक जण मोमोजवर ताव मारतात. अशात खवय्यांची आवड लक्षात घेता अनेक ठिकाणी व्हेज आणि नॉनवेज मोमोज उपलब्ध आहेत. अशात सध्या एक विचित्र व्हिडीओ समोर आलाय.
सोशल मीडियावर मोमोजच्या दुकानातील एक व्हिडीओ समोर आला आहे. स्टीम मोमोज हे नेहमी पाण्यावर शिजवले जातात. मात्र या मोमोज विक्रेत्याने चक्क पेप्सीवर आपले मोमोज शिजवून घेतले आहेत. त्याने स्टीमरमध्ये वरती मोमोज ठेवले असून खाली पाणी टाकण्याऐवजी पेप्सीची आधी बॉटल ओतली आहे. पेपसीवर हे सर्व मोमोज शिजवून घेतलेत.
आतापर्यंत चहा, कॉफी, मॅगी आणि पाणीपुरीमध्ये तुम्ही अशा प्रकारे अतरंगी फ्लेवर अॅड केल्याचं पाहिलं असेल. मात्र आता लोकांनी मोमोजला देखील सोडलेलं नाही. मोमोजमध्येही अशा प्रकारे विचित्र चव आणली जात आहे.@Hnv Street Food या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट केल्यात. पेप्सीमध्ये मोमोज शिजवण्यापेक्षा एखाद्या दारूमध्ये मोमोज शिजवले पाहिजे होते, अशी कमेंट एकाने केली आहे. तर आणखी एकाने या मोमोजला जेहेर मोमोज असं म्हटलं आहे.
प्रत्येक व्यक्ती स्ट्रीट फूड असले तरी ते स्वच्छ आणि चांगले जिथे मिळते त्याच ठिकाणी खाणं पसंत करतात. मात्र अनेक ठिकाणी स्ट्रीट फूड योग्य स्वच्छतेची काळजी न घेता बनवले जातता. त्यामुळे आरोग्यावर याचा गंभिर परिणाम होतो. काल देखील सोशल मीडियावर डॉमिनोज पिझ्झाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये एका व्यक्तीने पिझ्झा बनवताना नाकात बोट घालण्याचा किळसवाना प्रकार केला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.