king Cobra Bath: किंग कोब्राला साबण लावून घातली आंघोळ; VIRAL VIDEO पाहून तुमचंही डोकं चक्रावेल

Viral video King Cobra a Soap Bath: पाळलेल्या प्राण्यांची घरातील एका सदस्याप्रमाणे काळजी घेतली जाते. काही व्यक्ती सतत या प्राण्यांसोबत असतात.
king Cobra Bath
king Cobra BathSaam TV
Published On

Viral video: किंग कोब्रा सापाचे आजवर तुम्ही अनेक व्हायरल व्हिडीओ पाहिले असतील. अनेक व्यक्तींना प्राण्यांची फार अवड असते. मग यामध्ये कुत्रा, मांजर यांसह काही व्यक्ती तर अगदी साप देखील पाळतात. पाळलेल्या प्राण्यांची घरातील एका सदस्याप्रमाणे काळजी घेतली जाते. काही व्यक्ती सतत या प्राण्यांसोबत असतात. (Latest Marathi News)

आपल्या घरातील एका लहान बाळाप्रमाणे प्राण्यांची काळजी घेतली जाते. अनेक व्यक्ती कुत्रा मांजर यांना आंघोळ देखील घालतात. अशात सध्या सोशल मीडियावर एका किंग कोब्राला आंघोळ घालतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये एक तरुण त्याच्या पाळलेल्या किंग कोब्राला आंघोळ घालतोय.

king Cobra Bath
Gautami Patil News: अखेर गौतमी पाटील अन् माधुरीचं भांडण मिटलं; प्रेक्षकांसमोरच एकमेकींना मारली मिठी, व्हिडीओ VIRAL

किंग कोब्राला साबणाने आंघोळ

या तरुणाने सापाला साधीसुधी नाही तर साबण लावून आंघोळ घातलीये. साप चकचकीत चमकेपर्यंत हा व्यक्तीला त्याला आंघोळ घालतोय. सापाला आंघोळ घालतानाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

@HasnaZarooriHai या ट्वीटर अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. "गाय, कुत्रा किंवा मांजर यांना खायला घालताना, आंघोळ घालताना प्रत्येकाने खूप पाहिले आहे. पण याने तर मर्यादाच ओलांडली आहे.", असं कॅप्शन हा व्हिडीओ पोस्ट करत दिलं आहे.

king Cobra Bath
IT Dept. On Social Media Influencer: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आयकर विभागाच्या रडारवर; अनेकांची चौकशी होणार?

सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी या व्हिडीओला कमेंटमध्ये म्हटलंय की, आज तु या सापाला आंघोळ घालत आहेस. मात्र उद्या हाच साप तुझा जीव घेईल, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. तर आणखीन एकाने सापाला कोण आंघोळ घालतं का? असं म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com