Gautami Patil News: अखेर गौतमी पाटील अन् माधुरीचं भांडण मिटलं; प्रेक्षकांसमोरच एकमेकींना मारली मिठी, व्हिडीओ VIRAL

Gautami And Madhuri Friendship: प्रसिद्ध लावणी नृत्यांगना माधुरी पवारने काही दिवसांपूर्वी गौतमीवर कमेंट केली होती.
Gautami Patil News
Gautami Patil Newssaam tv
Published On

Pune News: सबसे कातील गौतमी पाटील तिच्या नृत्यानंतर अनेक कारणांनी चर्चेत आली. आपल्या नृत्याने आणि आडनावाने चर्चेत आलेली गौतमी तिच्या मैत्रीमुळे देखील चर्चेत आली होती. प्रसिद्ध लावणी नृत्यांगना माधुरी पवारने काही दिवसांपूर्वी गौतमीवर कमेंट केली होती. त्यावरुन या दोघींमध्ये शाब्दीक वार पलटवार दिसले. मात्र आता गौतमी आणि माधुरी या दोघींमध्ये मैत्री झाली आहे. (Latest Marathi News)

गौतमी पाटील आणि माधुरी पवार यांच्यातल्या वादावर अखेर पडदा पडलाय. पुण्यातील एका कार्यक्रमात दोघींनी एकमेकींना फ्रेन्डशिप बँड बांधले आहे. या दोघींमधील वाद मिटावा आणि त्या एकत्र याव्यात यासाठी अभिनेता सुभाष यादवनं प्रयत्न केलेत.

Gautami Patil News
7 Boys Ride One Bike: अरे ती बाईक आहे बस नाही! दुचाकीवरुन एकाचवेळी ७ जणांचा प्रवास, VIDEO VIRAL

गौतमी पाटीलच्या अभिनयावर आणि नृत्यावर माधुरी पवारनं टीका केली होती. मात्र आता दोघीही आपला वाद विसरून एकत्र आल्यात. दोघींच्या मनोमिलनामुळे सांस्कृतिक क्षेत्रात विविध चर्चा रंगवल्या जातायेत.

Gautami Patil News
तड तड तड तड....गौतमीचा आतापर्यंतचा सगळ्यात खतरनाक डान्स; Video Viral

"एक लोककलावंत म्हणजे काय? लोककला शिकावी लागते. ती जे करते ती खरंच लोककला आहे का?", अशा शब्दांत काही दिवसांपूर्वी माधुरीने गौतमीवर टीकास्त्र सोडलं होतं. यावेळी गौतमीनेही माधुरीला तोडीसतोड उत्तर दिलं. अखेर आता त्यांच्यातील वाद थांबला असून दोघींनीही मैत्री केलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com