Viral News: मधमाश्यांचा हल्ला झाल्यास 4 लाख मिळणार? नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारचा नवा जीआर?

Viral News: मधमाश्यांचा हल्ला झाल्यास तुम्हाला 4 लाखांची नुकसान भरपाई मिळू शकते...होय, असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय...पण, खरंच सरकार मदत देतं का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.
Viral News
bee attacksaam tv
Published On

मधमाश्यांचा हल्ला झाल्यानंतर आता मदत मिळणाराय. जखमी झालेल्यांना मोफत उपचार आणि मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना 4 लाख मिळणार, असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय. राज्यात मधमाश्यांच्या हल्ल्याचे अनेक घटना वाढल्यायत. त्यामुळे खरंच असा सरकारने निर्णय घेतलाय का? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.

व्हायरल मेसेज

मधमाशीच्या दंशामुळे मृत्यू झाल्यास 4 लाख रुपयांची आर्थिक मदत कुटुंबाला दिली जाईल. जखमी झालेल्यांना सरकारी हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार सुविधा उपलब्ध राहील. हा मेसेज व्हायरल होतोय.सध्या तरी साप, विंचू, वाघाने हल्ला केल्यास सरकारकडून मदत मिळते हे माहिती आहे. मात्र, आता मधमाश्यांनी हल्ला केला आणि मृत्यू झाला तर 4 लाखांची मदत मिळणार असा दावा केलाय.

कारण, मधमाश्यांच्या हल्ल्याचा ग्रामीण भागात अनेकांना सामना करावा लागतो. काहींचा मृत्यूही झालाय.त्यामुळे अशी योजना असेल तर याचा पीडिताला फायदा मिळायला हवा. साम टीव्हीही सातत्याने व्हायरल बातम्यांची सत्यता पडताळून सत्य समोर आणतं. त्यामुळे आमच्या टीमने वनअधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडूनच अधिक माहिती जाणून घेतली.

Viral News
Laxman Hake: विश्वास ठेवून महायुतीला मतदान केलं पण...; जरांगेंनंतर ओबीसी नेत्याचा मुख्यमंत्री फडणवीसांवर विश्वासघाताचा आरोप

महाराष्ट्र सरकारचा कोणत्याही विभागाकडे जीआर आलेला नाही हे स्पष्ट झालं. त्यामुळे आपल्या राज्यात हा निर्णय लागू झाला नाही.मात्र, असा निर्णय कोणत्या राज्यात लागू झालाय का? याची आम्ही पडताळणी केली त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.

व्हायरल सत्य/साम इन्व्हिस्टिगेशन

मधमाशींचा हल्ला झाल्यास 4 लाख नुकसान मिळत नाही

महाराष्ट्र सरकारचा कोणत्याही विभागाकडे जीआर नाही

उत्तर प्रदेश सरकारने नवीन निर्णय जाहीर केलाय

युपीत मधमाशीचा हल्ला हादसा नसून आपत्ती मानला जाणार

मधमाश्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांना 4 लाख रुपये मिळणार ही उत्तर प्रदेश सरकारचा निर्णय आहे...महाराष्ट्रातही साप, वाघ, हत्तीचा हल्ला झाल्यास नुकसान भरपाई मिळते...मात्र, मधमाश्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास महाराष्ट्र सरकार 4 लाखांची मदत देणार हा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com