Laxman Hake: विश्वास ठेवून महायुतीला मतदान केलं पण...; जरांगेंनंतर ओबीसी नेत्याचा मुख्यमंत्री फडणवीसांवर विश्वासघाताचा आरोप

Laxman Hake Criticized Mahayuti Government : ओबीसी आरक्षणासाठी लढा देणारे लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वासघाताचा आरोप केलाय. धनगर समाजाने विश्वास ठेवून महायुतीला मतदान केलं पण आमचा विश्वासघात झाल्याचा आरोप हाके म्हणालेत.
Laxman Hake
Laxman Hake Criticized Mahayuti Governmensaam Tv
Published On

मराठा आरक्षण नेते मनोज जरागेंनंतर आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांचाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरून विश्वास उडालाय. हाके यांनी मुख्यमंत्र्यावर विश्वासघाताचा आरोप केलाय. धनगर समाजाने विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीवेळी विश्वास ठेवून महायुतीला मतदान केलं. परंतु मुख्यमंत्री फडणवीस यांनी विश्वासघात केला, असा आरोप हाकेंनी केलाय. जर ओबीसी समाजाच्या समस्या सुटत नसतील तर सरकार विरोधात आंदोलन उभारू असा इशाराही लक्ष्मण हाकेंनी दिलाय. (OBC Leader Laxman Hake Criticized Mahayuti Government)

अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त लक्ष्मण हाके शनिवारी पंढरपुरात आले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी महायुती सरकारवर गंभीर आरोप केले. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीकडून धनगर समाजाला करण्यात आलेल्या आश्वसनांची त्यांनी आठवून दिली. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीच्या नेत्यांनी धनगर समाजाला एसटीच्या सवलती लागू करण्यात येतील, असा शब्द दिला होता.

Laxman Hake
Maharashtra Politics: महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? महायुतीला धक्का! बडा नेता मारणार सत्तेला लाथ

धनगर समाजाला एसटीचे आरक्षण द्यावे, याची शिफारस राज्य सरकारनं अजूनही केंद्राकडे केली नाहीये. एवढेच नव्हे तर अर्थमंत्री अजित पवार यांनी ओबीसींच्या महामंडळांना अर्थसंकल्पात निधीची तरतूद केलेली नाहीये, असं म्हणत लक्ष्मण हाके यांनी महायुती सरकारवर विश्वासघाताचा आरोप केलाय. धनगर समाजाला दिलेल्या आश्वसनाची पूर्तता केली नसल्यानं मुख्यमंत्री फडणवीसांनी धनगर समाजाचा विश्वासघात केलाय, अशा शब्दांत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी हल्लाबोल केला.

दरम्यान मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनीही अनेकवेळा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केलेत. त्यांनी फडणवीस यांच्यावर विश्वासघाताचे आरोप केलेत. आता जरांगे यांच्यानंतर लक्ष्मण हाके यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केलेत. राज्यातील धनगर समाजाने विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत महायुतीला मतदान केलं, त्यानंतर राज्यात फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीची सत्ता आली.

महायुतीची सत्ता आली पण धनगर समाज आणि ओबीसींचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. धनगर समाजासह ओबीसींनी महायुतीला भरभरून मतदान केले. महायुती सरकार त्यांचे प्रश्न सोडवतील अशी अपेक्षा होती, परंतु उलट धनगर समाजाची अडवणूक होतेय. देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींचा विश्वासघात केला, अशी टीकाही हाके यांनी केलीय.

निधीची अडवणुकीवरूनही लक्ष्मण हाकेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. राज्यातील व्हीजेएनटी, ओबीसी कल्याण, भटके विमुक्त यासह अनेक मंडळांचा सुमारे 1 हजार 500 कोटी रुपयांचा निधी अर्थमंत्री अजित पवार यांनी थांबवला, असा आरोपही लक्ष्मण हाके यांनी केलाय. राज्य सरकारने सारथीची इमारत एखाद्या शेअर मार्केटला लाजवेल,अशी उभारली आहे.

पण महाज्योतीसाठी अद्याप साथं कार्यालयही सरकारने दिलेलं नाही. ओबीसी विद्यार्थ्यांना राहण्यासाठी शहरामध्ये वसतिगृहही नाहीत. जर आमच्या समस्या सुटणार नसतील तर सरकारच्या विरोधात आंदोलन करावं लागले असं हाके म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com