Maharashtra Politics: महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? महायुतीला धक्का! बडा नेता मारणार सत्तेला लाथ

Maharashtra Mahayuti Government: महायुतीला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. एक बडा नेत्याचा पक्ष महायुतीतून बाहेर पडणार आहे.
Maharashtra Politics
Maharashtra Mahayuti Government
Published On

महापालिकेच्या निवडणुकीत भाजपकडून स्वबळावर लढण्याबाबतची चाचपणी केली जात आहे. मुंबई, ठाणे आणि पुणे महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याबाबत चाचपणीचे आदेशच महाराष्ट्र दौऱ्यात अमित शहांनी कार्यकर्त्यांना दिल्याचं. म्हटलं जात आहे, याचदरम्यान राज्यातील राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू झालीय.

या भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्ली असणार असल्याचं म्हटलं जात आहे. दिल्लीत महायुतीविरोधात काही तरी हालचाल होणार असल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीपासून दूर असलेले महादेव जानकर नवीन समीकरण जोडू पाहत आहे. मिळालेल्या माहितीनुसार,महादेव जानकर हे इंडिया आघाडीसोबत जाणार असल्याची चर्चा सुरू झालीय. मी सध्या महायुती, एनडीएसोबत नाही, असे सूचक विधान जानकर यांनी केलंय. त्यामुळे जानकर मोठा निर्णय घेण्याच्या तयारी आहेत.

Maharashtra Politics
Manikrao Kokate : कृषीमंत्री म्हणतात, ढेकळाचे पंचनामे करायचे का? माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा बरळले

राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर आता महायुतीला रामराम करणार आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर जानकर नाराज असल्याची चर्चा आहे. आता तर ते नवीन घरोबा करण्याच्या तयारीत आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने महादेव जानकरांनी दिल्लीत शक्तीप्रदर्शनाची जोरदार तयारी केली.

Maharashtra Politics
Mahadev Jankar: EVM मध्ये घोटाळा झाल्यामुळे महायुतीचा विजय, महादेव जानकरांचा गंभीर आरोप

या कार्यक्रमासाठी राहुल गांधी, शरद पवार आणि अखिलेश यादव यांना निमंत्रित करत पुढील राजकीय वाटचालीबाबत स्पष्ट संकेत दिलेत. आम्ही सध्या महायुती, एनडीएसोबत नाही. मी सध्या नवीन घरोबा करण्याच्या तयारीत आहे, असे सूचक विधानही जानकर यांनी केलंय.

राष्ट्रीय समाज पक्षाला सन्मानपूर्वक जागा दिल्या तरच आम्ही इंडिया आघाडीसोबत जाण्यास तयार आहोत. ज्या ठिकाणी विजयाची खात्री आहे, त्याच जागा मागण्याचा आमचा प्रयत्न असेल. लवकरच त्याबाबतची चर्चा सुरू होईल, असंही जानकर यावेळी म्हणालेत. दरम्यान राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील युती सरकारसोबत आहेत. मात्र आपल्याला दुर्लक्षित केल्याची भावना जानकर यांच्या मनात असून ते महायुतीला रामराम करण्याच्या तयारीत आहेत.

दरम्यान महादेव जानकर यांच्याविषयी आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिलीय. आपण कोणत्या पक्षात जाईल हे जानकारांना माहीत नसते, पण अखेर ते महायुतीतच येतील, ते स्वतःच वाटोळ करून घेणार नाहीत, असा विश्वास मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com