Loksabha Election 2024: आहेर नको; पंतप्रधान मोदींना मत द्या.. हटके लग्नपत्रिका व्हायरल

Viral Wedding Card News: एका भाजप समर्थकाने चक्क लग्न पत्रिकेवर पंतप्रधान मोदींचा फोटो छापत मतदान करण्याचे आवाहन केले आहे. ही लग्नपत्रिका सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे.
Viral Wedding Card News:
Viral Wedding Card News:Saamtv

Loksabha Election 2024:

देशभरात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. नेतेमंडळींसोबतच कार्यकर्त्यांमध्येही इलेक्शनचा उत्साह पाहायला मिळत आहे. प्रत्येकजण आपल्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी हटके आयडियाही शोधत आहेत. अशातच एका भाजप समर्थकाने चक्क लग्न पत्रिकेवर पंतप्रधान मोदींचा फोटो छापत मतदान करण्याचे आवाहन केले आहे. ही लग्नपत्रिका सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. (Loksabha Election 2024)

तेलंगणाच्या संगारेड्डी जिल्ह्यातील एका व्यक्तीने आपल्या मुलाच्या लग्नासाठी पाहुण्यांना आमंत्रित करताना केलेले आवाहन सध्या चर्चचा विषय ठरत आहे. नानिकांती नरसिम्हालू असे या भाजप समर्थकाचे नाव असून त्यांनी आपल्या मुलाच्या लग्नपत्रिकेवर पत्रिकेत नवविवाहित जोडप्यासाठी भेटवस्तू आणू नका, तर आगामी निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना मतदान करा, असा संदेश दिला आहे.

नानिकांती नरसिम्हालू यांचा मुलगा साईकुमार याचे महिमा राणीसोबत विवाह संपन्न होणार आहे. 4 एप्रिल रोजी हा विवाह सोहळा आहे. त्याआधी त्यांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. लग्नाला येताना महागडा आहेर नको, फक्त पंतप्रधान मोदींना मतदान करा, जर तुम्ही नरेंद्र मोदीजींना मत दिले तर ही लग्नाची भेटवस्तू ठरेल, असे यामध्ये म्हटले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Viral Wedding Card News:
Madha Lok Sabha Election 2024 : रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामुळे 'माढा'तील शिवसेनेत माेठी फूट? वाद चव्हाट्यावर

याबाबत बोलताना "माझी ही आयडिया मी माझ्या कुटुंबियांना सांगितली, ती सर्वांनाच खूप आवडली. त्यानंतर आम्ही अशी लग्नपत्रिका वाटण्यास सुरूवात केल्याचे नानिकांती यांनी सांगितले. दरम्यान, ही हटके लग्नपत्रिका सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. नेटकऱ्यांनीही त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Latest Marathi News)

Viral Wedding Card News:
Nashik : येवला शहरात भीषण स्थिती, पाण्यासाठी महिला आक्रमक; डोक्यावर उलटा हंडा ठेवत प्रभागातून काढला माेर्चा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com