Madha Lok Sabha Election 2024 : रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामुळे 'माढा'तील शिवसेनेत माेठी फूट? वाद चव्हाट्यावर

Lok Sabha Election 2024 : भाजप उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना अकलूजचे नेते धैर्यशील मोहिते पाटील आणि फलटणचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांची विरोध आहे.
shiv sena groupism in madha on ranjitsinh naik nimbalkar candidate of bjp
shiv sena groupism in madha on ranjitsinh naik nimbalkar candidate of bjpsaam tv

Madha Lok Sabha Constituency :

माढ्यात भाजप उमेदवारीचा तिढा सुटला आहे. परंतु महायुतीमधील अंतर्गत सुरू असलेला तिढा मात्र अजून ही कायम असल्याचे दिसून येत आहे. भाजपचे विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर (bjp mp ranjitsinh naik nimbalkar) यांना पाठिंब्या देण्यावरून शिवसेनेतील (shivsena) अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. (Maharashtra News)

शिवसेनेचे संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांनी खासदार निंबाळकर यांच्या विषयी नाराजी व्यक्त करत त्यांची उमेदवारी बदलावी अशी मागणी केली आहे. दुसरीकडे शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख महेश चिवटे यांनी मात्र वरिष्ठांच्या आदेशा नुसार खासदार निंबाळकरांचा प्रचार सुरू केला आहे. त्यांना विजयी करण्याचा निर्धार केल्याचे जाहीर केले आहे. शिवसेना मधील दोन्ही नेत्यांच्या परस्पर विधानांमुळे गटबाजी उघड झाली आहे.

shiv sena groupism in madha on ranjitsinh naik nimbalkar candidate of bjp
Ambenali Ghat Accident News : आंबेनळी घाटात भीषण अपघात, 400 फूट दरीतून मदत कार्य सुरु; अपघातस्थळी पर्यटकांची गर्दी

भाजप उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना अकलूजचे नेते धैर्यशील मोहिते पाटील आणि फलटणचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांची विरोध आहे. मोहिते - निंबाळकर गटाच्या विरोधानंतर आता आरोग्यमंत्री तानाजी सावंत (tanaji sawant) यांचे बंधू तथा सोलापूर शिवसेनेचे संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांनी ही भाजप उमेदवाराच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे निंबाळकरांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.

shiv sena groupism in madha on ranjitsinh naik nimbalkar candidate of bjp
Nashik : येवला शहरात भीषण स्थिती, पाण्यासाठी महिला आक्रमक; डोक्यावर उलटा हंडा ठेवत प्रभागातून काढला माेर्चा

शिवाजी सावंत यांनी काल कुर्डुवाडीत शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्यामध्ये खासदार निंबाळकर हे शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नाहीत असा आरोप केला. त्यांच्या कार्यपद्धती विषयी नाराजी व्यक्त केली. त्यांनी थेट उमेदवार बदलून मिळावा अशी मागणी केली. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

शिवाजी सावंत यांच्या या मागणी नंतर उपजिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी आज रणजितसिंह निंबाळकर यांची पाठराखण करत सावंत यांच्या भूमिकेला विरोध केला आहे. खासदार निंबाळकर यांनी मतदार संघात अनेक विकास कामं केल्याचा दावा करत त्यांना मोठ्या मताधिक्यांनी विजयी करण्याचा निर्धार चिवटे यांनी व्यक्त केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सावंत आणि चिवटे यांच्या परस्पर विरोधी भूमिकेमुळे शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा या निमित्ताने उफाळून आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेची सगळी सूत्रे ही संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांच्या हाती असली तरी चिवटे यांच्या पाठिंब्यावरून शिवसेनेतील वाद समोर आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

shiv sena groupism in madha on ranjitsinh naik nimbalkar candidate of bjp
Holi 2024 : कोल्हापुरात केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध, 'आप'ने ईडीच्या नावानं मारली बोंब

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com