School Video Viral: वाह! याला म्हणतात शाळा; जेवणानंतर विद्यार्थ्यांसाठी झोपण्याची सुविधा, भन्नाट VIDEO व्हायरल

Student Video Viral: सध्या सोशल मीडियावर एक अनोख्या शाळेतला व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे. यामध्ये शाळेत विद्यार्थ्यांना फक्त अभ्यास नाही तर झोपण्यासाठी देखील सोय करण्यात आली आहे.
School Video Viral
School Video ViralSaam TV
Published On

Video Viral:

प्रत्येक विद्यार्थ्याला शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी पाठवले जाते. घरात आई वडिलांनी केलेल्या संस्कारासह मुलांना शाळेतूनही उत्तम संस्कार मिळायला हवेत, शिस्त लागायला हवी असं अनेक जण म्हणतात. अशात सध्या सोशल मीडियावर एक अनोख्या शाळेतला व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे. यामध्ये शाळेत विद्यार्थ्यांना फक्त अभ्यास नाही तर झोपण्यासाठी देखील सोय करण्यात आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

School Video Viral
Women Fighting Video Viral: कार्यक्रमात गाणं गाण्यावरून 2 लेडीसिंगर भिडल्या; बेदम हाणामारीचा VIDEO तुफान व्हायरल

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की चायनामधील या शाळेत सर्व शाळकरी विद्यार्थी आहेत. निळ्या रंगाच्या बाकांवर चिमुकले विद्यार्थी कसलाही ताण न घेता निवांत झोपले आहे. सोशल मीडियावर विद्यार्थ्यांच्या आरामाचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आम्हालाही अशीच शाळा हवी अशी आशा व्यक्त केलीये.

चीनमधील काही शाळांमध्ये, फोल्ड करण्यायोग्य यंत्रणा वापरून डेस्कचे काही मिनिटांत बेडमध्ये रूपांतर केले जाऊ शकते. ज्यामुळे मुलांना त्यांच्या मानसिक विकासास समर्थन देण्यासाठी त्यांच्या झोपेच्या वेळी विश्रांती घेता येते, असं कॅप्शन हा व्हिडीओ शेअर करत देण्यात आलंय. @ViralXfun या ट्वीटर अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय.

आतापर्यंत हा व्हिडीओ २८५ वेळा रीट्वीट करण्यात आला आहे. भारतातही शाळेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेकांनी यावर पॉजीटीव्ह कमेंट करत पसंती दर्शवली आहे. शाळेत असताना अनेक विद्यार्थ्यांची सकाळी ७ वाजता शाळा असते. त्यामुळे ६ वाजता तरी विद्यार्थ्यांना उठावं लागतं. एवढ्या सकाळी उठल्यानंतर दुपारी देखील आराम हवा.

झोप पूर्ण न झाल्यास लहान मुलं फार चिडचिड करतात. त्यांची चिडचिड झाल्याने अभ्यासातही लक्ष लागत नाही त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांसाठी झोपण्याची सोय करण्यात आलीये.

School Video Viral
Snake Theft Sandal: हे पहिल्यांदाच पाहिलं राव; चप्पल चोरून सापाने ठोकली धूम, VIDEO व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com