Women Fighting Video Viral: कार्यक्रमात गाणं गाण्यावरून 2 लेडीसिंगर भिडल्या; बेदम हाणामारीचा VIDEO तुफान व्हायरल

Women Fighting In Singing Program: बायकांना भांडण करण्यासाठी कारण नाही लागत त्या कोणत्याही कारणावरून वाद करू शकतात असं म्हणतात. असाच काहीसा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Women Fighting Video Viral
Women Fighting Video ViralSaam TV
Published On

Viral Video:

सोशल मीडियावर नेहमीच महिलांच्या हाणामारीचे व्हिडीओ पाहायला मिळतात. मुंबई लोकल किंवा मग दिल्ली मेट्रो येथे तर महिलांची हाणामारी हमखास पाहायला मिळते. बायकांना भांडण करण्यासाठी कारण नाही लागत त्या कोणत्याही कारणावरून वाद करू शकतात असं म्हणतात. असाच काहीसा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Women Fighting Video Viral
Crime News: पतीच्या डोक्यात संशयरूपी हैवान शिरला, जीवापाड प्रेम करणाऱ्या पत्नीसोबत केलं भयंकर कृत्य

व्हायरल (Viral) व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका मोठ्या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. व्यासपीठावर दोन महिला आहेत. तसेच अन्य काही मान्यवर व्यक्ती आहेत. काही वेळाने कार्यक्रम सुरू होतो.

एकाचवेळी दोन महिला सिंगर

आता या कार्यक्रमात आयोजकांनी एकाचवेळी दोन महिला सिंगर बोलवल्या आहेत. यातली एक सिंगर गात असताना मध्येच दुसरी महिला सिंगर देखील गाऊ लागते. दोघींची गाणी मिक्स होतात. कारण दोघीही वेगवेगळी गाणी गात असतात.

तितक्यात पाहिले गाणं गात असलेली महिला थांबते आणि दुसऱ्या महिलेला ओरडू लागते. यावर दुसरी सिंगर महिला आपण काहीच चुकीचे केले नाही अशा विचारात एटीट्यूड दाखवते. ही महिला एवढ्यावरच थांबत नाही तर पहिले गाणं (Song) गात असलेल्या महिलेच्या जोरदार कानामागे देते.

दोघींची दे दणादण हाणामारी

याचा त्या महिलेला फार राग येतो आणि मग सुरू होते दोघींची दे दणादण हाणामारी. दोघीही एकमेकींचे केस जोरजोरात ओढतात आणि एकमेकींना मारहाण करतात. आता यांची भांडणं सोडवणार कोण असाही प्रश्न उपस्थित होतो. कारण आलेल्या रसिकांना गाणं तर ऐकायला मिळत नाही त्यामुळे या दोघींची हाणामारी तरी पाहू अस म्हणत सर्व जण तेथे मजा पाहत बसतात. काही वेळाने तेथील उपस्थित व्यक्ती दोघींच्या भांडणामध्ये पडतात आणि वाद मिटवतात.

Women Fighting Video Viral
Lalit Patil Crime News: ड्रग्जमाफीया ललित पाटीलसह चार जणांना न्यायालयीन कोठडी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com