आपल्यापैंकी प्रत्येक व्यक्तीच्या लहानपणी असलेल्या काही गोष्टीच्या अनेक आठवणी असतात. त्यातील सर्वसाधारण वस्तूची आवठण ही निळ्या आणि पांढऱ्या रंगाची स्लीपरची ही असेल. प्रत्येकाने ही स्लीपर लहानपणी एकदा तरी नक्कीच घातली असेलच एवढेच नाही तर अजूनही काहींच्या घरी आपल्याला ही स्लीपर दिसून येते.
ही स्लीपर बाजारात अगदी १०० रुपयांपासून आपल्याला विकत मिळते. मात्र याच स्लीपर विकत घेण्यासाठी कोणी लाखो रुपये दिले तर? नक्की हे वाचून तुम्ही जरा विचारात पडला असाल ना? मात्र होय सध्या सोशळ मीडियावर अशाच एका स्लीपरची जोरदार चर्चा होतेय. ज्या स्लीपरच किंमत लाखोत आहे. चला तर पाहूयात जोरदार चर्चा होणाऱ्या या स्लीपरबद्दल.
लाखोची स्लीपर
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ भारतातील नसून कुवेतमधील आहे. सौदी अरेबियातील कुवेतमध्ये ही स्लीपर चक्क लाखो रुपयांना एका दुकानात विकली जात आहे. सौदी अरेबियातील पैशांनुसार या स्लीपरची किंमत (Price)तेथे साधारण ४,५०० रियाल आहे अर्थात ही किंमत भारतामध्ये एक लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.
व्हायरल होत असलेल्या या स्लीपरला अनेकांकडून ट्रेंडी(Trendy) सँडल असेही नाव देण्यात येत असून स्लीपरची किंमत ऐकून सर्वांचे लक्ष सध्या या स्लीपरकडे आहे. मात्र स्लीपरची किंमत पाहिल्यावर अनेकजण टीकाही करत असून अनेकजण मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया करत आहेत.
पाहा व्हिडिओ
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत स्लीपर ही कुवेतमधील एका दुकानात दिसत आहे शिवाय व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की दुकानातील एक कर्मचारी (officers)आहे जो या लाखो रुपये चप्पलचे अनेक वैशिष्टे तसेच किंमत सांगताना दिसत आहे.
व्हायरल स्लीपरचा व्हिडिओ(Video) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील @rishibagree या अकाउंटवर शेअक करण्यात आलेला आहे. शिवाय व्हिडिओ शेअर केल्यानंतर कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,आपण भारतीय या सँडल्सचा वापर टॉयलेट फुटवेअर म्हणून करतो'.या व्हिडिओच्या कमेंट् बॉक्समध्ये अनेक गंमतशीर प्रतिक्रियाही आल्या आहेत त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,'ही स्लीपर आम्ही तर फक्त ६० रुपयांना विकत घेतो' तर आमच्या इकडे प्रत्येक घरोघरी अशी स्लीपर असते'.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.