मोबाईल आणि इंटरनेटच्या या जमान्यात संकटात सापडलेल्यांचा व्हिडिओ काढण्यापलिकडे काही केलं जात नाही. त्यामुळे योग्यवेळी मदत न मिळाल्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. मात्र याला दिल्लीतील एक डॉक्टर अपवाद ठरली आहे. आज दिल्ली विमानतळावर तिने दावलेलं प्रसंगावधान आणि योग्य वेळी केलेली मदत, यामुळे तिचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तिने एका ६० वर्षांच्या वृद्धाला मृत्यूच्या दाढेतून सोडवून आणलं आहे.
तर झालं असं की, दिल्ली विमानतळावरील क्रमांक २ टर्मिनलवर एक ६० वर्षांचा वृद्ध अचानक हृदयविकाराचा झटका झटका येऊन जागीच कोसळला. शरीराची कोणतीही हालचाल होत नव्हती. आजूबाजूला लोक जमले पण कोणीही मदतीसाठी पुढे येत नव्हतं. अखेर या गर्दीतून एक महिला समोर आली. ही अशी वेळ होती की वृद्धाला वाचवणं जवळपास अशक्यच होतं, कारण त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्यात उतारवय आणि शरीराची हालचालही नाही.
गर्दीतून मदतीसाठी धावून आलेली महिला डॉक्टर होती. तिने लगेच सीपीआर दिला. तब्बल ५ मिनिटे तिने आपले प्रयत्न सुरू ठेवले होते. अखेर तिच्या प्रयत्नांना यश आलं. वृद्धाने डोळे उघडले. अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून तिने या वृद्धाला सोडवून आणलं आहे. एका महिला डॉक्टरने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आणि ५ मिनिटांच्या अथक प्रयत्नातून एका ६० वर्षांच्या वृद्धाला जीवदान मिळालं आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर डॉक्टरचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.