Konkan Railway: गणपती बाप्पा मोरया! शिट्ट्या अन् टाळ्या, कोकण रेल्वे सुरू झाल्यानंतर प्रवाशांचा मोठा जल्लोष VIDEO

Passenger Reaction After Konkan Railway Start: मुसळधार पावसामुळे मागील काही दिवस कोकण रेल्वे बंद होती. आता पु्न्हा रेल्वेसेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
कोकण रेल्वे
Konkan RailwaySaam Tv
Published On

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसाची बॅटिंग सुरू होती. त्यामुळे कोकणात जाणारे मार्ग बंद झाले होते. कोकण रेल्वेसेवा देखील गेल्या काही दिवसांपासून बंद होती. त्यामुळे अनेक प्रवासी अडकून पडले होते. परंतु आता पावसाने काहीशी उसंत दिल्यामुळे कोकण रेल्वे पुन्हा सुरू झालीय. यावेळी गाडी सुटतानाचा एक व्हिडिओ कोकण रेल्वेने त्यांच्या अधिकृत X अकाउंटवर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये रेल्वे सुटताना प्रवाशांचा मोठा जल्लोष पाहायला मिळत (Konkan Railway) आहे. गणपती बाप्पा मोरया! असं म्हणत प्रवाशांनी मोठा जल्लोष व्यक्त केला. त्यानंतर प्रवाशांच्या शिट्ट्या अन् टाळ्यांचा आवाज संपूर्ण रेल्वेमध्ये गुंजत होता. प्रवाशांनी मोठा आरडोओरडा करत त्यांचा आनंद व्यक्त केल्याचं या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे. रेल्वेसेवा पूर्ववत झाल्यामुळे प्रवाशांना आनंद अनावर झाल्याचं (Konkan Railway Passanger) दिसतंय.

मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना कोकणातून समोर आल्या होत्या.तर अनेक ठिकाणी रेल्वे रूळांवर पाणी साचलेले होते. प्रवाशांच्या हिताच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने कोकण रेल्वेने गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु यामुळे अनेक प्रवासी अडकून पडले होते. त्यानंतर आज पहिली गाडी कोकणाकडे रवाना (Konkan Railway Latest Update) झालीय.

कोकण रेल्वे
Indian Railway: रिझर्व्हेशन कोचमधून प्रवास करताय तर थांबा, रेल्वेच्या वेटिंग तिकीटाबाबत समोर आली मोठी अपडेट

हा व्हिडिओ कोचुवेली - श्री गंगानगर एक्स्प्रेसमधील आहे. दिवाणखावटी-विन्हेरे सेक्शनमधून जात असताना प्रवाशांकडून कृतज्ञता व्यक्त होताना दिसत आहे. टाळ्या शिट्ट्यांच्या माध्यमातून प्रवाशांनी त्यांचा आनंद व्यक्त करत रेल्वे प्रशासनाचे आभार मानले (Viral Video) आहेत. जवळपास ४ ते ५ दिवसांपासून अधिक काळ कोकण रेल्वे बंद होती. रेल्वे पुन्हा सुरू झाल्यामुळे प्रवाशांमध्ये मोठं उत्साहाचं वातावरण आहे. मुसळधार पावसामुळे कोकणात जाणाऱ्या रेल्वे बंद झाल्या होत्या, त्यामुळे प्रवाशांच्या आनंदांवर विरजन पडलं होतं. परंतु रेल्वे पुन्हा पूर्ववत सुरू झाल्याने त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नसल्याचं व्हिडिओत दिसतंय.

कोकण रेल्वे
Indian Railway: रिझर्व्हेशन कोचमधून प्रवास करताय तर थांबा, रेल्वेच्या वेटिंग तिकीटाबाबत समोर आली मोठी अपडेट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com