
Cctv Footage Video: पावसाळ्यात दरवर्षी अनेक अपघातांच्या, दुर्घटनांच्या घटना समोर येत असतात. भिंती कोसळण्याच्या घटना, झाडे उन्मळून पडण्याचे प्रकार, रस्त्यांवर पाण्याचा साठा, विजेचा धक्का, स्लिप होणे अशा असंख्य गोष्टींमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. अशातच एक थरारक घटना समोर आली आहे जिथे एक महिला अवघ्या काही सेकंदांच्या फरकाने मृत्यूच्या जबड्यातून सुखरूप बचावली गेली आहे.
या व्हायरल(Viral) व्हिडिओमध्ये, एक महिला पावसात छत्री घेऊन घराच्या दिशेने येताना दिसते. ती गेट उघडते आणि घरात प्रवेश करते. ती घरात शिरल्यापासून केवळ ४ ते ५ सेकंद होत नाहीत, तोच घराबाहेरील भिंत अचानक कोसळते. पावसामुळे भिंतीचा पाया कमजोर झाला होता आणि ती संपूर्ण भिंत भर्रकन कोसळली. ज्या ठिकाणी ही महिला काही सेकंदांपूर्वी उभी होती, तिथेच ही भिंत कोसळते.
सीसीटीव्हीने टिपला थरार
ही घटना पावसाच्या वेळची असून संपूर्ण प्रसंग घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की, ती भिंत अचानक कोसळते. या भिंतीमुळे मोठा आवाज होतो आणि आजूबाजूचे लोक धावत घराकडे येतात.
या घटनेचा व्हिडिओ(Video) व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. "एक सेकंदाचाही उशीर झाला असता, तर काहीतरी भयंकर घडलं असतं," अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. काहींनी म्हटलं की, "ही बचावली नाही तर चमत्कारच आहे." तर अनेकांनी अशा धोकादायक भिंतींची वेळेत पाहणी करण्याची मागणी केली आहे.
टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.