Jennifer Lopez : स्टेजवर गाणं गाता गाता अचानक स्कर्ट सरकला; प्रसिद्ध गायिकेसोबत नेमकं काय घडलं? VIDEO

Jennifer Lopez oops moment : कॉन्सर्टमध्ये गाणं गाताना जेनिफर लोपेजचा स्कर्ट सरकला. गायिकेचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
Jennifer Lopez viral video
Jennifer Lopez Saam tv
Published On
Summary

अमेरिकन पॉप स्टार जेनिफर लोपेज स्टेज गाणं गाताना स्कर्ट सरकल्यामुळे चर्चेत आली आहे.

जेनिफरचा स्कर्ट सरकल्यानंतर तिचा बिकिनी लूक प्रेक्षकांना दिसला.

पॉप स्टार जेनिफरने आत्मविश्वासाने आणि हसत हसत हा प्रसंग हाताळला.

जेनिफरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तिच्या प्रोफेशनलिझमचं कौतुक होत आहे.

Jennifer Lopez Oops Moment : अमेरिकेची पॉप स्टार जेनिफर लोपेजच्या फक्त आवाजाचे नाही, तर तिच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. लाखो हृदयावर राज्य करणारी जेनिफर लोपेज एका व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. एका स्टेजवर गाणं गाताना अचानक तिचा स्कर्ट सरकरला. जेनिफरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Jennifer Lopez viral video
Malshej Ghat Kalu Waterfall Tragedy : मुसळधार पावसामुळे नदीला अचानक पूर, ३०० पर्यटक अडकले; सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, जेनिफर लोपेज एका कॉन्सर्टमध्ये गाणं गात आहे. या कॉन्सर्टमध्ये जेनिफर चाहत्यांशी बोलताना दिसत आहे. त्याचवेळी जेनिफरने घातलेला स्कर्ट कंबरेवरून सरकरला. त्यामुळे जेनिफरचा बिकनी लूक चाहत्यांना दिसला. मात्र, या घटनेनंतर एका अभिनेत्रीने तिच्या प्रोफेशनलिझमचं कौतुक केलं आहे.

Jennifer Lopez viral video
Train Accident : १०० प्रवाशांना घेऊन जाणारी ट्रेन रुळावरून घसरली

लाखोंच्या गर्दीत जेनिफरला एका लाजीरवाण्या प्रसंगाला सामोरे जावं लागलं. जेनिफर तरीही न डगमगता आणि न घाबरता हसत हसत प्रसंगाला सामोरी गेली. स्कर्ट सरकल्यानंतर तिच्या टीमने तिला दुसरा स्कर्ट आणला. त्यावेळी गायिका जेनिफर हसताना दिसत आहे. स्टेजवरील प्रसंग मोठ्या हुशारीने हाताळला.

दरम्यान, जेनिफर लोपेज एक अमेरिकन पॉस्ट आणि अभिनेत्री आहे. जेनिफरचा जगभर मोठा चाहता वर्ग आहे. जेनिफर ५६ वर्षांची असून तिचा फिटनेस चांगला आहे. तिच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. जेनिफरने अनेक ब्लॉकबस्टर गाणे गायले आहेत. तिच्या चाहत्यांना तिचे गाणे तोंडपाठ असतात. सोशल मीडियावर लाखो लोक फॉलो करतात. जेनिफर सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com