काळी साडी आणि केस मोकळे; सांगलीत पुन्हा अवतरली तड्कडताई; VIDEO

Mother Of Ghost Viral Video: काळी साडी, मोकळे केस आणि अंधारात घुमणारा आवाज. सांगलीत पुन्हा एकदा ‘तड्कडताई’ अवतरली आहे. तिच्या रहस्यमय उपस्थितीमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून, हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Mother Of Ghost Viral Video
Mysterious Tadkadtai Spotted again in Sangli woman in black saree with open hair causes fear among localsSaam Tv
Published On

Sangli News Marathi: सांगली शहराच्या गल्लोगल्लीत लहान मुलांवर दहशत पसरलीय, ही दहशत कोणी चोरट्याची, पोलिसांची अथवा भुताची नसून हि दहशत आहे तड्कडताईची. जेष्ठ महिन्यात आषाडीच्या अमावास्येला दैत्याचा संहार करण्यासाठी म्हैशासुर मार्दीनी तड्कड ताईचा वेश घेऊन शहराची रखवाली करण्यासाठी फिरत असते.

अंगावर साडी, तोंडावर काळा मुखवटा, हातात सूप घेऊन सांगली(Sangli News) शहरात धावणारी हि आहे तड्कडताई. जेष्ठ महिन्यातील अमावस्येला सांगलीमध्ये भावई यात्रेत जोगण्या उत्सवाला सुरुवात होत असते. तडकड ताई, भुताची आई, असा गजर करत लहान मुले या तडकडीचे स्वागत करतात.

ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी दरवर्षी सायंकाळी ४ वाजता जोगण्या उत्सवाची सुरुवात होत असते या उत्सवात कुंभार घराण्याला 'तड्कडी' काढण्याचा मान प्राप्त असतो. काळी साडी, मोकळे केस, हातात सूप आणि चेहऱ्यावर तडकडीचा भीषण मुखवटा असा तिचा वेश असतो. तडकडताईच्या लग्नाची वरात कुंभारखिंड, सांभारे गणपती, सिटी हायस्कूल मार्गे स्मशानभूमीकडे वळते. संध्याकाळी ६ वाजता, सूर्य मावळतीला जात असताना गव्हाच्या अक्षतांनी तिचा विवाह पार पडतो.

या विवाह सोहळ्यासाठी शेकडो ग्रामस्थ, आबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित असतात. लग्नसोहळ्यानंतर, तडकडताई खोडकर मुलांना आपल्या सुपातून प्रसाद देते. लोकश्रुतीनुसार, तिच्या सुपाचा हलकासा मार बसल्यास मुलांवरील इडा-पिडा, आजार किंवा संकटे दूर होतात, अशी धारणा आ

अमावस्येचा हा कार्यक्रम (Program) पार पडल्यानंतर आषाढातल्या पौर्णिमेपर्यंत शहरातील ठराविक भागात जाऊन ती जोगवा मागते. तडकड ताईचा दरारा हा खूप मोठा असतो. अनेक लहान मुलेच नाहीत तर मोठी मुलेही या तड्कडताई ला प्रचंड घाबरतात. संस्थान काळापासून सुरु असलेली हि परंपरा आता २१ व्या शतकातहि जपली जात आहे.

टीप: सांगलीमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Mother Of Ghost Viral Video
चिमुकला फणा काढलेला सापाला खायला निघाला, आई-वडिलांचे लक्ष कुठे?; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com