हा 'रेडा' साधासुधा नाही, वर्षाला कमावतो 25 लाख रुपये; याची किंमत जाणून चाट पडाल

Golu-2 : हरियाणातून गोलू-२ रेड्याची सध्या खूप चर्चा आहे. त्याची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे. त्याच्या मालकाचे नाव नरेंद्र सिंह आहेत. या गोलूची किंमत जवळपास १० कोटी आहे. गोलू-२ फक्त ६ वर्षांचा आहे.
Golu-2
Golu-2Saam Tv
Published On

Golu-2 Buffalo Worth Rs 10 Crore :

भारत हा कृषिप्रधान देश हे. शेतीसाठी आवश्यक असलेल्या गाय, बैला, म्हैस यांना आपण देवाप्रमाणे पुजतो. या प्राण्यांमध्येही वेगवेगळे प्रकार असतात. त्यांची वेगवेगळी खासियत असते. असाच एक १० कोटींच्या रेड्याची सर्वत्र चर्चा होत आहे.

बिहारमध्ये आयोजित केलेल्या सोनपूर मेळ्यात देशातून वेगवेगळे प्राणी आले आहेत. त्यातील एक म्हणजे गोलू-२. हरियाणातून हा रेडा पाटणामध्ये आला होता. त्याच्या मालकाचे नाव नरेंद्र सिंह आहेत. या गोलूची किंमत जवळपास १० कोटी आहे. गोलू-२ फक्त ६ वर्षांचा आहे.

जेवणावर हजारो रुपये खर्च

गोलू-२ चे वजन सुमारे १५ क्विंटल आहे. या रेड्याची उंची सुमारे साडेपात फूट आहे. या रेड्याची किंमत १० कोटी आहे. हा रेडा दररोज ३५ किलो हिरवा चारा आणि हरभरा खातो. याचसोबत रोज ७-८ किलो गुळाचा त्याच्या आहारात समावेश होतो. त्याचसोबत कधीकधी त्याला तूप आणि दूध दिले जाते. सुका मेव्याच्या त्याच्या आहारात समावेश नसतो. त्याच्या जेवणावर जवळपास ३०- ३५ हजार रुपये खर्च होतो, असे गोलू-२ चे मालक नरेंद्र सिंह यांनी सांगितले.

Golu-2
CCTV Footage : रस्त्यावरील कुत्रे मागे लागले, भीतीनं माय-लेकी स्कूटी घेऊन थेट घुसल्या घरात, VIDEO व्हायरल

नरेंद्र सिंह हा व्यवसायाने पशुपालक आहे. २०१९ मध्ये पशुउत्पादनातील योगदानाबद्दल त्यांना भारत सकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. गोलू- २ ची ना फक्त भारतात तर विदेशातही खूप मागणी आहे. गोलू- २ हा देशभरातील जत्रेत जातो आणि स्पर्धेत भाग घेतो. हा रेडा २५ लाख रुपये कमवतो.

Golu-2
Vande Bharat Train Restaurant: विदाऊट तिकीट फूल जेवण!,'वंदे भारत'ट्रेनमध्ये पुरवा जिभेचे चोचले अन् पैसेही वाचवा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com