Ganpati Miravnuk Viral Video
Viral VideoSaam TV

Viral Video : गणपतीची मिरवणूक येताच आजीनं धरला ढोल-ताशांवर ठेका; पाहा VIDEO

Ganpati Miravnuk Viral Video : सोशल मीडियावर वृद्ध व्यक्तींच्या डान्सचे आणि धम्माल मस्ती करतानाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. आताही असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे.
Published on

आनंद व्यक्त करताना प्रत्येक व्यक्ती नाचण्यास सुरुवात करतो. आनंद व्यक्त करण्यासाठी वयाचं कोणतंही बंधन नसतं. आजवर सोशल मीडियावर वृद्ध व्यक्तींच्या डान्सचे आणि धमाल मस्ती करतानाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. आताही असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे.

Ganpati Miravnuk Viral Video
Kadyavarcha Ganpati : महाराष्ट्रातील 'या' जागृत देवस्थानाला भेट द्या, इच्छापूर्ती सोबत होईल सुंदर निसर्गाची अनुभूती

उद्याचा जन्माष्टमी उत्सव साजरा झाला की लगेच पुढील महिन्यात ७ सप्टेंबरला गणपती बाप्पा येत आहेत. महाराष्ट्रात गणेशोत्सवाची एक वेगळीच धमाल असते. अगदी महिने दोन महिने आधी पासून या सणाच्या तयारील सुरुवात होते. तुम्ही सुद्धा घरी गणरायाच्या आगमनासाठी तयारीला सुरुवात केली असले. सध्या सोशल मीडियावर सुद्धा गणपती बाप्पाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

त्यात @hitesh_khache या इंस्टाग्राम अकाउंटवर बाप्पाच्या मिरवणुकीचा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये काळा चौकीच्या महागणपतीची मिरवणूक सुरू आहे. रस्त्यावरून जाणारी मिरवणूक आणि ढोल ताशांच्या आवाजाने येथील परिसर अगदी मंत्रमुग्ध झाला आहे.

एक आजी आपल्या घरातील खिडकीमधून बाप्पाची ही मिरवणूक पाहत आहेत. बाप्पाची मिरवणूक आल्याचं पाहताच आजी खिडकीत उभ्या राहून मस्त डान्स करू लागतात. ढोल ताशा जसा वाजत आहे त्याच पद्धतीने येथे आजीबाई सुंदर सुंदर स्टेप्स करत आहेत. वय फक्त आकडाच या वाक्याचा अर्थ पुन्हा एकदा आजींच्या डान्सने समजला आहे.

सध्या सोशल मीडियावर आजीबाईंचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी आपल्या कमेंटमधून सुद्धा आजींचं भरपूर कौतुक केलं आहे. कधीच मनाने म्हातारे होऊ नका, असं सुद्धा एका व्यक्तीने कमेंटमध्ये म्हटलं आहे. बाप्पा समोर कधीच वयाचे भान राहत नाही, अशीही कमेंट एकाने केली आहे.

Ganpati Miravnuk Viral Video
Ganesh Visarjan Miravnuk : मुंबई,पुणे सहित राज्यात सर्वत्र विसर्जन मिरवणुकीचा उत्साह ; पाहा व्हिडीओ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com