आधारकार्ड आणि रेशनकार्ड हे दोन्ही ज्यांच्याकडे आहे त्यांना आता सरकार मोफत मोबाईल देणार आहे...मोदींनी स्वत: घोषणा करतानाचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय...यामध्ये एक अट टाकण्यात आलीय...तुमच्या घरात कुणी सरकारी नोकरदार असेल तर ही योजना लागू होणार नाही...बऱ्याच जणांकडे आधारकार्ड आणि रेशनकार्डही आहे...त्यामुळे मोफत मोबाईल कसा मिळवायचा...? असा अनेकांना प्रश्न पडलाय...त्यामुळे आम्ही या व्हिडिओची पडताळणी सुरू केली...
मोबाईल म्हणजे आता मूलभूत गरज झालीय...एकवेळ जेवण नसेल तरी चालेल पण, मोबाईल शिवाय हल्ली कुणीही घरातून बाहेर पडत नाही...आणि आता सरकार मोफत मोबाईल देणार असल्याचा दावा केल्याने अनेकांना उत्सुकता आहे की मोबाईल कसा मिळवायचा...? त्यासाठी काही अर्ज भरायचा आहे का...? अर्ज कुठे मिळतो...? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत...त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमने अशी सरकारची योजना आहे का...? याची आम्ही पडताळणी सुरू केली...याबाबत आम्ही सरकारकडून अधिक माहिती मिळवली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...
मोफत मोबाईलची केंद्र सरकारची योजना नाही
पंतप्रधान मोदींनी अशी कुठेही घोषणा केली नाही
मोदींचा आवाज AIच्या माध्यमातून तयार केलाय
आधार,रेशनकार्डवर मोफत मोबाईल मिळत नाही
मोदींनी मोफत मोबाईलची अशी कोणतीही घोषणा केलेली नाही...आम्ही हा व्हिडिओ नीट पाहिला त्यावेळी मोदींचा आवाज आणि मोदी बोलत असलेल्या व्हिडिओत तफावत दिसतेय...मोदींच्या व्हिडिओमागे आवाज लावण्यात आलाय...त्यामुळे आमच्या पडताळणीत केंद्र सरकार आता आधार, रेशनकार्ड असलेल्यांना मोफत मोबाईल देणार असल्याचा दावा असत्य ठरलाय...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.