Viral Scorpio Video:
Viral Scorpio Video: Saamtv

Viral Video: खतरनाक स्टंट! स्कॉर्पिओचा सुसाट वेग अन् टपावर फटाक्यांची आतिषबाजी; धक्कादायक VIDEO

Viral Scorpio Video: स्कॉर्पिओच्या मालकाचा शोध घेण्यासाठी पोलिस परिसरातील CCTV फुटेज तपासत आहेत.
Published on

Viral Video News:

देशभरात सध्या दिवाळीचा जल्लोष अन् उत्साह पाहायला मिळत आहे. फटाक्यांच्या आतषबाजीत मोठ्या धुमधडाक्यात दिवाळीचा सण साजरा केला जातो. दिवाळीच्या काळात फटाके फोडण्यासाठी तरुणाईची नुसती लगबग सुरू असते. अनेकदा फटाके फोडताना हुल्लडबाजीचेही प्रकार घडतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये काही तरुणांनी चक्क धावत्या कारवर फटाके फोडल्याचे दिसत आहे.

दिवाळी (DIwali Festival 2023) म्हणजे दिव्यांचा, झगमगाटांचा अन् फटाक्यांच्या आतषबाजीचा सण. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच फटाके वाजवायला आवडतात. फटाके म्हणजे ज्वलनशील पदार्थ. ते वाजवताना काळजी घेण्याचे आवाहन अनेकदा केले जाते. मात्र काही हौशी आणि हुल्लडबाज तरुण अशा सुचनांकडे दुर्लक्ष करुन इतरांना इजा पोहोचवतात.

कधी डब्यामध्ये, ड्रममध्ये फटाके लावून तर कधी मुक्या जनावरांच्या शेपटीला फटाके बांधून पेटवण्याचे संतापजनक प्रकारही पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमधील हौशी मुलांनी चक्क धावत्या स्कॉर्पिओकारवर पटाके लावण्याचा प्रताप केल्याचे दिसत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Viral Scorpio Video:
Wardha News : वर्धेतील गोसंवर्धन गोरस भंडारचा संप; कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणीचा निषेध

व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, वाहनांची मोठी वर्दळ असलेल्या रस्त्यावरुन काळ्या रंगाची स्कॉर्पिओ सुसाट वेगात धावत आहे. या गाडीवर काही हुल्लडबाज तरुणांनी फटाके पेटवून ठेवले असून चालू गाडीवर हे फटाके जोराने फुटत असल्याचे दिसत आहे. अशा प्रकारे चालू गाडीवर फटाके फोडण्याचा जीवघेणा स्टंट पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

अशाप्रकारे धोकादायकरित्या फटाके वाजवून इतरांना त्रास देवू नका अशा प्रतिक्रिया काही जणांनी दिल्या आहेत. तर या हुल्लडबाज तरुणांवर कारवाई करण्याचीही मागणी काही जणांनी केली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलीसही या तरुणांचा शोध घेत आहेत. या स्कॉर्पिओच्या मालकाचा शोध घेण्यासाठी पोलिस परिसरातील CCTV फुटेज देखील तपासत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com