Beed News: बाप नसूनही बापासारखा आदर! एसटीतल्या या अनोख्या नात्याची राज्यभर चर्चा..

Viral Video: ज्यांनी अख्ख आयुष्य एसटी चालवून लोकांची सेवा केली.. त्याच सहकाऱ्याला शेवटच्या दिवशी जमिनिवर पाय न टेकू देता, थेट खांद्यावर बसवून कार्यालयात दाखलं केलंय.
बाप नसूनही बापासारखा आदर! एसटीतल्या या अनोख्या नात्याची राज्यभर चर्चा..
Beed NewsSaam Tv

आयुष्य हे डॉक्टरांच्या गोळ्या घेऊन नाही.. तर, मित्रांच्या टोळ्या घेऊन जगायचं असतं.. हे दाखवणारी ही दृष्य आहेत. आयुष्यभर लालपरीची सेवा करणाऱ्या या दोन मित्रांचं प्रेम, एका तरुण सहकाऱ्याने दुसऱ्या वयस्कर सहकाऱ्याला दिलेला हा निरोप खरचं भारीये.

गळ्यात हार, डोक्यावर फेटा, अन डोळ्यावर गॉगल, एसटीतून जमिनीवर पाय न ठेवू देता, पायरीवरूनचं थेट खांद्यावर उचलून घेत या निवृत्त होणाऱ्या वयस्कर मित्राला या तरुणा सहकाऱ्याने सन्मान दिलाय.. ज्याने अख्ख आयुष्य लालपरीतून लोकांची पालखी वाहिली.. आज शेवटच्या दिवशी त्याच सहकाऱ्यासाठी या तरुणाने स्वत:च्या खांद्याची पालखी केलीये.

बाप नसूनही बापासारखा आदर! एसटीतल्या या अनोख्या नात्याची राज्यभर चर्चा..
Devendra Fadnavis: लोकसभेची निवडणूक, फडणवीसांची परीक्षा? दोन पक्ष फोडल्याचा फायदा होणार की तोटा?

भावनांना शब्द नसतात.. त्यामुळे कधीकधी भावना व्यक्त करायला कृती करावी लागते.. अशीच काहीशी कृती गणेश काळेने केलीये. ज्यांनी अख्ख आयुष्य एसटी चालवून लोकांची सेवा केली.. त्याच सहकाऱ्याला शेवटच्या दिवशी जमिनिवर पाय न टेकू देता, थेट खांद्यावर बसवून कार्यालयात दाखलं केलंय.

जिथं सिनिअर ज्युनिअर पॉलिटीक्स असतं. तिथं सिनिअर ज्युनिअर हा भेद न पाळता थेट बापलेकासारखं नात जपणाऱ्या या दोन मित्रांची बीडमध्ये चर्चा आहे. बीडच्या आष्टी डेपोत परसराम ढोबळे आणि गणेश काळे यांचं नात जयविरुपेक्षा कमी नाहीये. परसराम ढोबळे हे गणेशच्या वडीलांच्या वयाचे आहेत. गणेशने परसराम यांच्याबरोबर 6 वर्ष सोबत काम केलं. या 6 वर्षात या दोघांना जणू एकमेकांचा लळाच लागला. पण, परसराम ढोबळे सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्त झालेल्या आपल्या मित्राला या तरुणाने सन्मान दिलाय.

बाप नसूनही बापासारखा आदर! एसटीतल्या या अनोख्या नात्याची राज्यभर चर्चा..
Maharashtra Politics: जनता ठरवणार खरी शिवसेना कुणाची? जनतेच्या कोर्टात शिंदे-ठाकरेंचा निकाल; 13 मतदारसंघांमध्ये दोन्ही गट आमनेसामने

एका सहकाऱ्याला खांद्यावर उचलून घेणं , ही फार मोठी गोष्ट नाहीये.. पण, या छोट्या छोट्या गोष्टीच आयुष्य सुंदर करतात.. गणेशने आपल्या मित्राचा शेवटचा दिवस त्यांना फेटा घालून, त्यांच्या छोटेखानी मिरवणून काढून यादगारच बनवला.. बापलेकाचं जिवाचं वैर पहायला मिळणाऱ्या या स्वार्थी जगात या रक्तालिकडच्या नात्याची जोरदार चर्चा रंगलीये.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com