Devendra Fadnavis: लोकसभेची निवडणूक, फडणवीसांची परीक्षा? दोन पक्ष फोडल्याचा फायदा होणार की तोटा?

Lok Sabha Election 2024 Results: महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत सर्वात मोठी अग्निपरीक्षा आहे ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची. युती-आघाड्यांपासून ते उमेदवार ठरवण्यापर्यंत राज्यातल्या भाजपचं नेतृत्व हे फडणवीसांकडे होतं. त्यामुळे लोकसभेच्या यश-अपयशावर फडणवीसांच्या पुढच्या राजकीय भवितव्यावर परिणाम होणार आहे.
लोकसभेची निवडणूक, फडणवीसांची परीक्षा? दोन पक्ष फोडल्याचा फायदा होणार की तोटा?
Lok Sabha Election 2024 ResultsSaam Tv

लोकसभा निवडणुकीत मोदी-शाहांना किती यश मिळणार याकडे देशाचं लक्ष लागलं असलं तरी महाराष्ट्रात भाजपचं नेतृत्व असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीही अग्निपरीक्षा आहे. कारण भाजपला लोकसभेत बळकट करण्यासाठी त्यांनी गेल्या दोन वर्षांपासून केंद्राच्या मदतीनं सर्व डावपेच वापरत अभ्यास सुरू केला होता.

दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत पडलेली उभी फूट हा त्याचाच भाग होता. वेळप्रसंगी त्यांनी त्यागाचीही भूमिका ठेवली, कारण भाजपच्या निम्मे जागाही नसलेल्या एकनाथ शिंदेंसाठी फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदावर पाणी सोडलं.

लोकसभेची निवडणूक, फडणवीसांची परीक्षा? दोन पक्ष फोडल्याचा फायदा होणार की तोटा?
Maharashtra Politics: जनता ठरवणार खरी शिवसेना कुणाची? जनतेच्या कोर्टात शिंदे-ठाकरेंचा निकाल; 13 मतदारसंघांमध्ये दोन्ही गट आमनेसामने

मात्र तरीही भाजपला लोकसभेत अनुकूल वातावरण नसल्याचं चित्र असल्यामुळे त्यांनी बेरजेच्या राजकारणाचा प्रयोग कायम ठेवला, अजित पवारांना सोबत घेण्याची रणनीती आखली आणि शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादीतही उभी फूट पडली. काहींनी त्यांच्या या रणनीतीला चाणक्यनीती संबोधून त्यांचं कौतुक केल. तर फोडाफोडीच्या राजकारणावरून त्यांना तेवढ्याच तीव्र टीकेचा सामनाही करावा लागला.

लोकसभेची निवडणूक, फडणवीसांची परीक्षा? दोन पक्ष फोडल्याचा फायदा होणार की तोटा?
India Alliance: 'उद्या रात्रीपर्यंत दिल्लीतच थांबा', लोकसभा निकालाआधी काँग्रेसचे मित्रपक्षांना आवाहन; काय आहे कारण?

दोन पक्षांना सोबत घेऊन फडणवीसांच्या नेतृत्वाखालील भाजपनं लोकसभेत राज्यात 45 प्लसचा नारा दिला. मात्र एक्झिट पोलमध्ये भाजपला अपेक्षित यश मिळताना दिसत नाही. त्यामुळे साम-दाम-दंड भेदाची निती वापरलेल्या भाजपला लोकसभेत किती जागा मिळणार यावर य़ा परीक्षेतलं फडणवीसांचं यश अवलंबून आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com