पुणे : पुणे जिल्ह्यातील जुन्नर वनुपरिक्षेत्रात बिबट्या आणि पट्टेरी वाघाची दहशत पसरली आहे. एका हिंसक वाघाचा रस्त्यावरून रुबाबात चालतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओतील पट्टेरी वाघ जुन्नरमधील असल्याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये सुरु झाली आहे. या व्हिडिओमागचं सत्य आता समोर आलं आहे.
सोशल मीडियावर एक पट्टेरी वाघ आणि त्याचे बछडे रस्ता ओलांडत असल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हायरल होणारा व्हिडिओ जुन्नर वनपरिक्षेत्रातील बेल्हे जेजुरी मार्गावरील मंगरुळ पारगाव येथील असल्याचा दावा केला जात आहे. सोशल मीडियातून व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे नागरिकांमध्ये दहशतीची धडकीच भरली आहे.
एकीकडे बिबट आणि मानव यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. तर दिवसरात्र शेतशिवार,रस्त्यावर,लोकवस्तीत दिसणारे बिबट आणि माणसांसह पाळीव प्राण्यांवर होणारे हल्ले यामुळे नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. त्यातच जुन्नर वनपरिक्षेत्रात पट्टेरी वाघ आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओची वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सत्यता पडताळणी केली. त्यानंतर व्हायरल झालेला व्हिडिओमध्ये बिबट नसून पट्टेरी वाघच आहे हे सत्य समोर आलं आहे. मात्र हा व्हिडिओ जुन्नर वनपरिक्षेत्रातील नसल्याची सत्यता समोर आली आहे.
बिबट आणि पट्टेरी वाघ हे दोन्ही मांजरी कुळातील असल्याने नागरिकांमध्ये बिबट आणि वाघ ओळखण्यात गल्लत होते. वाघ हा शरीराने मोठा आणि अंगावर पट्टे असतात. तर बिबट सडपातळ लांब आणि अंगावर ठिपके असतात. मात्र अनेक वेळी नागरिक बिबट्याला वाघ समजून चर्चा करत असतात. असं असलं तरी जुन्नर वनपरिक्षेत्रातील खेड आंबेगाव जुन्नर शिरुर तालुक्यात बिबट्याची संख्या मोठी आहे. तरी या भागात पट्टेरी वाघ आढळून येत नाही, असा निर्वाळा वनविभागाने केला.
बिबट प्रवण क्षेत्र असलेल्या जुन्नर वनपरिक्षेत्रात बिबट्याच्या दहशीत पट्टेरी वाघाचा वावर असलेला व्हिडिओच्या पडताणीत असत्य ठरलाय, त्यामुळे बिबट आणि वाघ यांच्यातील तुलना करताना गैरसमज पसरु नये, असे आवाहन विभागाने केले.
Edited By - Vishal Gangurde
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.