ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जुन्नर तालुका म्हणजे छत्रपती शिवाजी महारांजाचे जन्मस्थान.
जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. शिवनेरी किल्ला हा पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे.
जुन्नर तालुका हा निसर्गाने समृद्ध आहे. पावसाळ्यात जुन्नरमध्ये धबधबे ओसंडून वाहत असतात.
जुन्नरमध्ये तुम्ही अष्टविनायक गणपतींपैकी दोन गणपतींचे दर्शन घेऊ शकता.
लेण्याद्री आणि ओझरला जाऊन तुम्ही गणपती बाप्पाचे दर्शन घेऊ शकतात.
नाणेघाट हा निसर्गाने समृद्ध आहे. नाणेघाटात पावसाळ्यात पांढरेशुभ्र धबधबे वाहतात.
दाऱ्या घाट पावसाळ्यात धुक्यांनी झाकून जातो. तेथील निसर्ग खूप सुंदर असतो.
जुन्नरमधील खोडद येथे आशियातील सर्वात मोठी दुर्बिण आहे. ही दुर्बिण पाहण्यासाठी पर्यटकांची खूप गर्दी होते.