ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सातारा जिल्ह्यातील कराड शहर हे साखर उत्पादनाशिवाय तिथे असलेल्या पर्यटन स्थळासाठी प्रसिद्ध आहे.
कराड शहरात कृष्णा - कोयनेचा संगम झाला आहे. त्या ठिकाणाला कृष्णा घाट म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी यशवंतराव चव्हणांची समाधी आहे.
कराड शहरापासून काही अंतरावर सदाशिवगड आहे. जो शिवकालीन किल्ला आहे. या गडावर शिवशंभूमहादेवाचे मंदिर असल्याने याला शिवगड नाव पडले.
कराडपासून काही अंतरावर प्रसिद्ध आगाशिव लेणी आहे. दरवर्षी अनेक पर्यटक येथे भेट देत असतात.
कराडपासून अवघ्या १ किलोमीटर अंतरावर वसंतगड आहे. पावसाळ्यात पर्यटकांची संख्या येथे जास्त असते.
महाराष्ट्रात राज्यातील सर्वात मोठे कोयना धरण कराड शहरापासून काही किलोमीटर अंतरावर आहे. हे धरण पाहण्यासाठी अनेक पर्यटक येथे येत असतात.
जगभर प्रसिद्ध असलेले पालीचे खंडोबाचे मंदिर कराड शहरापासून काही अंतरावर आहे. तारळी नदीच्या काठी हे मंदिर स्थित आहे.
प्रतिसंगमाच्या जवळच भुईकोट किल्ला आहे. दररोज अनेक पर्यटक या किल्ल्या भेट देतात.