Fact Check: मच्छरांची सरकारी फॅक्टरी; डेंग्यूवर इलाज करणारा मच्छर? व्हिडिओमागचं सत्य काय?

Mosquitoes Factory Fact Check: मच्छर बनवण्याची तुम्ही कधी फॅक्टरी पाहिलीय का? डेंग्यू रोखण्यासाठी मच्छर तयार करण्याची फॅक्टरी तयार केल्याचा दावा करण्यात आलाय. पण, खरंच डेंग्यूवर मात करण्यासाठी मच्छर तयार केला जातोय का? याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.
Mosquitoes Factory Fact Check
Inside the mosquito factory: Can creating mosquitoes really help fight dengue?saam tv
Published On
Summary
  • डेंग्यू रोखण्यासाठी मच्छर फॅक्टरी तयार केल्याचा दावा समोर आलाय.

  • या फॅक्टरीत कोट्यवधी मच्छर तयार केले जातात.

  • दावा असा की हे मच्छर डेंग्यू डासांचं प्रमाण कमी करतात.

मच्छरांची फॅक्टरी या फॅक्टरीत मच्छर बनवले जातायत. होय, फॅक्टरीत कोट्यवधींच्या संख्येनं मच्छर तयार केले जातात आणि दावा करण्यात आलाय की हे मच्छर डेंग्यूवरील डासांवरच इलाज करतो. ऐकलंत यांनीच हा दावा केलाय की, डेंग्यूंच्या डासांचं प्रमाण कमी झालंय आणि यामुळेच डेंग्यूपासून बचाव होऊ शकतो.

Mosquitoes Factory Fact Check
Fact Check : पोस्टाकडून पती-पत्नीला दरमहा 36 हजार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? वाचा स्पेशल रिपोर्ट

डेंग्यूवर अजून औषध आलेलं नाही. पावसाळ्यात अनेकांना डेंग्यू होतो. काहींचा मृत्यूही होतो. यामुळे जर डेंग्यूच्या डासावरच इलाज करणारा मच्छर असेल तर हे चांगलंच आहे...पण, ही फॅक्टरी आहे कुठे? एवढ्या मोठ्या प्रमाणात मच्छर कुठे तयार केले जातायत? याची आम्ही सत्यता जाणून घेण्यासाठी पडताळणी सुरू केली. हे भारतात असेल तर चांगलंच आहे. भारतातही असा प्रयोग झालाय का? याची आम्ही माहिती मिळवली. त्यावेळी हे संशोधन सध्या ब्राझीलमध्ये सुरू असल्याची माहिती समोर आली.

व्हायरल सत्य/ साम इन्व्हिस्टिगेशन

ब्राझीलमध्ये वोल्बाचिया बॅक्टेरियाने संक्रमित डास तयार करतात

जंगली डासांमध्ये विषाणूचा प्रसार रोखता येतो

फॅक्टरीत तयार केलेले डास जंगली डासांसोबत प्रजनन करतात

डासांमुळे डेंग्यू आणि इतर रोगाचे व्हायरस नष्ट होतो

डासांमुळे डेंग्यू, झिका, चिकनगुनियाच्या घटनांमध्ये घट

Mosquitoes Factory Fact Check
Dengue symptoms neurological: डेंग्यूची लक्षणं हलक्यात घेऊ नका; मेंदूशी संबंधित गुंतागुंती वाढू शकतात, डॉक्टरांचा इशारा

ही फॅक्टरी ब्राझीलमध्ये आहे. तिथे दरवर्षी हजारो लोकांचा डेंग्यूमुळे मृत्यू होतो.त्यामुळे संशोधन करून डासच तयार करण्यात आलेयत. याबाबत अधिक माहिती आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेतली. ही फॅक्टरी कशी आहे? कशा प्रकारे इथे मच्छर बनवले जातात पाहुयात.

मच्छर फॅक्टरी कशी आहे?

ब्राझीलच्या क्युरिटिबा शहरात मच्छरची फॅक्टरी

फॅक्टरीत 70 कर्मचारी काम करतात

डासांच्या अंड्यांमध्ये वोल्बाचिया बॅक्टेरियाचा संसर्ग सोडतात

विशेष वाहनांचा वापर करून डास शहरांमध्ये सोडले जातात.

फॅक्टरीत तयार केलेले डास जंगली डासांसोबत प्रजनन करतात आणि नवीन तयार होणाऱ्या डासांमध्ये विषाणू पसरवण्याची क्षमता कमी होतेय. त्यामुळे आमच्या पडताळणीत डेंग्यूवर इलाज करणारा मच्छर असल्याचा दावा सत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com