देशभरात दिवाळीनिमित्त उत्साहाचं वातावरण आहे. देशभरातील लोकांनी दिवाळीनिमित्त जय्यत तयारी केलेली दिसत आहे. या दिवाळी सणासाठी भारतातील सर्वच कर्मचाऱ्यांचं कंपनीच्या दिवाळी बोनसकडे लक्ष असतं. काही कंपनीतील कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस मिळाला आहे. तर काही कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना फक्त सोनपापडी, काजू बर्फी सारखे गोड पदार्थ मिळाले आहेत. बोनसवरून सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल झाले आहेत. या दिवाळीत बोनसवरून तरुणांचं भन्नाट गाणं व्हायरल झालं आहे. (Latest Marathi News)
दिवाळीचा बोनस म्हणजे कर्मचाऱ्यांच्या वर्षभरातील मेहनतीचं फळ असतं. कंपनीला झालेल्या नफ्यावर बोनसची रक्कम ठरत असते. या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना बोनस दिला आहे. तर काही कंपनीने देशातील मोठ्या सणासुदीसाठी मिठाई, कपडे आदी भेटवस्तू दिल्या आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दिवाळीत अनेकांची नव्या वस्तू, कपडे आणि फराळ बनविण्याची लगबग असते. या दिवाळीत सर्वसामान्यांना महागाईची झळ बसत आहे. या सणासाठी घरातील कमवत्या व्यक्तीचा खर्चही अधिक वाढतो. त्यामुळे दिवाळीचा बोनस मिळाला पाहिजे, असं मागणी करणारं भन्नाट गाणं तरुणांनी तयार केलं आहे. तरुणांचं हे गाणं प्रचंड व्हायरल झालं आहे.
तरुणांच्या गाण्यात काय मजकूर आहे?
दिवाळी म्हटलं तर खर्च आलाच. या गाण्यातील तरुणांचं म्हणण आहे की, 'दिवाळी आल्याने आता खर्च होईल. त्यामुळे दिवाळी बोनस मिळाला पाहिजे. आम्हाला मिठाई, सोनपापडी देऊ नका. त्या बदल्यात पैसे द्या. दिवाळी बोनसची रक्कम आम्हाला उपयोगी पडेल. आता बायको ऐकत नाही. बायकोला खरेदीची घाई आहे. तर मुलांना फटाके फोडण्याची इच्छा आहे, अशा आशयाचं गाणं तरुणांनी गायलं आहे.
तरुण कलाकार योगेश तवार याने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. योगेशने सात दिवसांपूर्वी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. योगेश आणि त्याच्या मित्रांनी 'बहरला हा मधुमास' या मराठी गाण्याच्या चालीवर गाणं तयार केलं आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी शेकडो प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर या व्हिडिओला ६६ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स दिले आहेत. तर एक लाखांहून अधिक जणांनी व्हिडिओ शेअर केला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.