Delhi Metro Fighting Video: दिल्ली मेट्रोत दे दणादण; तोंडावर चापट आणि बेदम बुक्क्या, दोन व्यक्तींमधील हाणामारीचा VIDEO व्हायरल

Two Men Fight In Delhi Metro: व्हिडिओमध्ये दोन प्रवाशी एकमेकांवर तुटून पडल्याचं दिसत आहे.
Delhi Metro Fighting Video
Delhi Metro Fighting VideoSaam TV
Published On: 

Delhi Metro: दिल्ली मेट्रो त्यात घडणाऱ्या घटणांमुळे कायमच चर्चेत असते. सातत्याने या ट्रेनमध्ये काहीनाकाही घटना घडत असतात. आता देखील दिल्ली मेट्रोमधला एक जबरदस्त हाणामारीचा व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये दोन प्रवाशी एकमेकांवर तुटून पडल्याचं दिसत आहे. (Latest Viral Video)

मेट्रो ट्रेन आणि सकाळची वेळ म्हटल्यावर त्यात मोठी गर्दी जमा होते. सर्वच व्यक्ती मेट्रो ट्रेनच्या दिशेने धाव घेतात. गर्दीच्यावेळी नाही म्हटलं तरी एकमेकांना धक्का लागतो. यामध्ये प्रवाशांनी एकमेकांना समजून घेणं महत्वाचं आहे. मात्र गर्दीच्यावेळी धक्का लागल्यावर अनेक प्रवाशी आक्रमक होतात आणि भांडण करण्यास सुरुवात करतात.

Delhi Metro Fighting Video
Rain Viral Video: पठ्ठ्यांनी कहरच केला! मुसळधार पाऊस अन् तरुणांनी बाईकवर केली अंघोळ; व्हिडिओ तुफान व्हायरल...

दिल्ली (Delhi) मेट्रोत सातत्याने अतरंगी घडना घडतात. अशात आता या दोन प्रवाशांचा व्हिडिओ व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, दोन व्यक्ती एकमेकांसोबत बेदम हाणामारी करत आहेत. एक व्यक्ती दुसऱ्याच्या तोंडावर बुक्का मारत आहे. त्यांची भांडणे सोडवण्यासाठी इतर प्रवाशी त्यांना बाजूला करत आहेत. मात्र हे दोघेही एकमेकांवर तुटून पडलेत.

शेवटी स्टेशन आल्यावर ट्रेन थांबते मग यातील एक व्यक्ती खाली उतरतो. त्यांचा हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी यावर भन्नाट कमेंट केल्यात. व्हिडिओ (Video) पोस्ट करत त्यावर लिहिलं आहे की, मेट्रो ट्रेनमध्ये काही घडल्याशिवाय मेट्रो ट्रेनचा दिवस पूर्ण होत नाही.

Delhi Metro Fighting Video
Kartik Aaryan Spotted Flying Economy Class :आलिशान गाड्यांमधून फिरणाऱ्या कार्तिक आर्यननं केला इकॉनॉमी क्लासने प्रवास; Video Viral

काही दिवसांपूर्वीच मेट्रो ट्रेनमध्ये (Metro Train) एक तरुणी केसांना स्ट्रेट करताना दिसली. मेकअप करण्यासाठी वेळ न मिळाल्याने तिने थेट मेट्रो ट्रेनमध्येच आपलं पार्लर ओपन केलं आहे. तरुणीने मेट्रोमध्ये असलेल्या प्लगला आपला हेअर स्ट्रेटनर जोडला आणि केसांना स्ट्रेटनींग करण्यास सुरुवात केली. अशा अनेक अतरंगी घटना मेट्रो ट्रेनमधून सातत्याने समोर येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.