भारतात आयफोन -15 सीरीजची विक्री सुरू झाली आहे. आयफोन 15 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड पाहायला मिळत आहे. आयफोन मिळविण्यासाठी मोबाइलप्रेमी काहीही करू शकतात, याचं एक उदाहारण समोर आलं आहे.
बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झालेल्या आयफोन -१५ सीरीजच्या फोनसाठी दिल्ली, मुंबईत विविध राज्यातून नागरिक भल्या मोठ्या रांगेत उभे राहताना दिसून येत आहेत. याच आयफोन स्टोअरमधील कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्ली येथील रूप नगर भागातील क्रोमा सेंटरमध्ये शुक्रवारी ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारीची घटना घडली. याच इलेक्टॉनिक्स स्टोअरमध्ये आयफोनची विक्री करण्यात येत आहे.
या स्टोअरमधून एका ग्राहकाने मोबाइल बुक केला होता. मात्र, या आयफोनची डिलिव्हरीला उशीर झाला. यामुळे ग्राहक संतापले. त्यांनी थेट या स्टोअरमधील कर्मचांऱ्यांना कपडे फाटेपर्यंत मारलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इलेक्टॉनिक्स स्टोअरच्या सेल्समनला मारहाण केल्याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. जसकीरत सिंग आणि मनदीप सिंग या ग्राहकांना अटक करण्यात आली आहे. या दोघांनी क्रोमा सेंटरमध्ये आयफोन 15 बुक केला होता. त्यांना आयफोन 15 मिळण्याची अपेक्षित तारीख शुक्रवारची होती.
मात्र ,आयफोन 15 डिलिव्हरी मिळण्यासाठी उशीर झाला. त्यामुळे दोन्ही ग्राहक दुकानात येऊन सेल्समनवर खूप चिडले. दुकानात आल्यानंतर जसकीरत सिंग आणि मनदीप सिंग या ग्राहकांनी क्रोमा सेंटरमधील सेल्समनसोबत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तसेच या दोघांनी रागाच्या भरात क्रोमा सेंटरमधील सेल्समनला मारहाण करण्यास सुरूवात केली.
या दोघांनी सेल्समनला कपडे फाटेपर्यंत मारहाण केली. क्रोमा सेंटरमधील वस्तूंचे नुकसानही केल्याचे ही व्हिडिओत दिसत आहे. हा सगळा प्रकार तेथील एका व्यक्तीने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. याप्रकरणी क्रोमा सेंटरमधील कर्मचाऱ्यांकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती.
दरम्यान, तक्रार दाखल झाल्यानंतर उत्तर दिल्लीचे पोलीस उपायुक्त सागर सिंग कलसी यांनी क्रोमा सेंटरमधील घटनेचा आढावा घेतला. तसेच सदर व्हिडिओची पुष्टी करत आरोपी जसकीरत सिंग आणि मनदीप सिंग या दोघांविरूद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान, आयफोनचे ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमधील हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.