Crocodiles Coming From Ground: जमीन फाडून मगरी बाहेर निघाल्या; रेस्क्यू ऑपरेशनचा काळजात धडकी भरवणारा VIDEO VIRAL

Viral Video: तुम्ही ज्या घरात गेल्या अनेक दिवसांपासून राहत आहात तेथे जमिनीतून अचानक एक मगर आणि तिचं पिल्लू बाहेर आलं तर?
Crocodiles Coming From Ground
Crocodiles Coming From GroundSaam TV
Published On

Crocodile Rescue Viral Video: मगरीच्या तावडीत कोणी सापडलं तर त्या व्यक्तीचा मृत्यू अटळ आहे. मगर नाव ऐकलं तरी अनेकांना भीती वाटते. अशात तुम्ही ज्या घरात गेल्या अनेक दिवसांपासून राहत आहात तेथे जमिनीतून अचानक एक मगर आणि तिचं पिल्लू बाहेर आलं तर? काळजात धडकी भरवणारी ही घटना प्रत्यक्षात घडली आहे. (Latest Marathi News)

व्हायरल व्हिडीओमध्ये एकामागून एक जंगली मगरी बाहेर आल्यात. दोन व्यक्ती या मगरींना रेस्क्यू करत आहेत. यातील एक व्यक्ती बाहेर येत असलेल्या मगरीला पकडण्याचा प्रयत्न करतोय. त्याने मगरीच्या मानेला पकडलंय. तर दुसरा एक जण या मगरीचे तोंड बांधण्याचा प्रयत्न करतोय.

Crocodiles Coming From Ground
7 Boys Ride One Bike: अरे ती बाईक आहे बस नाही! दुचाकीवरुन एकाचवेळी ७ जणांचा प्रवास, VIDEO VIRAL

ही भली मोठी मगर बाहेर येत नाही तोच तिच्या खालून आणखी एक मगर बाहेर येते. मगरींचा हा व्हिडीओपाहून अनेकांच्या अंगावर सर्ररकन काटा येतोय. व्हिडीओमध्ये देखील मगरींना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं दिसत आहे. एकापाठोपाठ दोन मगरी बाहेर आल्यावर उपस्थितांची एकच धांदळ उडते.

@makassar_iinfo या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला १० लाख व्ह्यूव्ज मिळालेत. तर ४८ हजारांहून अधिक व्यक्तींनी व्हिडीओ लाइक केला आहे.

Crocodiles Coming From Ground
Palghar Talasari Hospital Viral Video: पालघरला मांत्रिकाकडून ग्रामीण रुग्णालयात उपचार, व्हिडिओ व्हायरल; गुन्हा दाखल हाेणार?

एका इंग्रजी वृत्तपत्राने या व्हिडीओबाबत लिहिलं आहे की, या घरामध्ये जमिनीतून अचानक आवाज येऊ लागला होता. कोणीतरी जमिनीवर आदळत आहे असं वाटत होतं. त्यामुळे या व्यक्तींनी जमीन खोदण्याचं ठरलं. जमिनीवरील लादी आणि माती बाजूला काढल्यावर समोर जे दिसलं त्याने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com