सिंहली स्पोर्ट्स क्लब येथील कोलंबो स्टेडिअमवर अफगाणिस्तान आणि श्रीलंकेच्या संघात कसोटी सामना खेळला जात आहे. हा सामना घोरपडीने थांबवला. दुसऱ्या दिवसाचा खेळ चालू असताना या सामन्यात घोरपड मैदानात उतरली. पंचाचे लक्ष घोरपडीकडे गेल्यानंतर हा सामना थांबवण्यात आला. याआधीही एका सामन्यात साप शिरल्याची घटना घडली होती.(Latest News)
श्रीलंका संघाची फलंदाजी चालू असताना कोमोडो ड्रॅगन जातीच्या घोरपडीने मैदानात एंट्री घेतली. बाउंड्री जवळील अंपायरचं घोरपडीकडे लक्ष गेल्यानंतर हा सामना काही काळासाठी थांबवण्यात आला. सामना तिथेच थांबवण्यात आला. मात्र काही वेळाने पुन्हा सामना सुरू झाला. अफगाणिस्तानला १९८ धावांत ऑल आऊट केल्यानंतर श्रीलंकेने १०० हून अधिक धावांची आघाडी घेतलीय. श्रीलंकेच्या धावसंख्येने ३०० धावांचा टप्पा ओलांडलाय.
लाईव्ह सामन्यात घुसली घोरपड
मैदानाच्या सीमेरेषेजवळ ही घोरपड दिसली होती. त्यानंतर या घोरपडीने चालू सामन्यात एंट्री घेतली. सामना काही काळ थांबवावा लागला. यानंतर पुन्हा सामना सुरू झाला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. श्रीलंकेत असे काही घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही वेळापूर्वी एका सामन्यादरम्यान मैदानात साप दिसला होता.
अफगाणिस्तानचा संघ १९८ धावांत ऑल ऑऊट
कसोटीच्या पहिल्या दिवशी श्रीलंकेने अफगाणिस्तानला पहिल्या डावात १९८ धावांत गुंडाळलं होतं. श्रीलंकेने दिवसाचा खेळ संपेपर्यंत एकही विकेट न गमावता ८० धावा केल्या होत्या. दिमुथ करुणारत्ने ४२ धावा आणि निशान मदुष्का ३६ धावा केल्यात. दरम्यान श्रीलंकेचा संघ ११८ धावांनी पिछाडीवर आहे. मात्र दुसऱ्या दिवशी श्रीलंकेच्या फलंदाजांनी शानदार फलंदाजी करत १०० हून अधिक धावांची आघाडी घेतलीय.
गोलंदाजांची शानदार कामगिरी
श्रीलंकेचा डावखुरा वेगवान गोलंदाज विश्वा फर्नांडोने ५१ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. असिथा फर्नांडोने २४ धावा देत ३ बळी घेतले. तर फिरकी गोलंदाज प्रभात जयसूर्याने ६७ धावा देत ३ तीन बळी घेतले. दरम्यान श्रीलंकेने पाहुण्या संघाला २०० धावांमध्ये थांबवलं. अफगाणिस्तानसाठी रहमत शाहने ९१ धावा केल्या. मात्र त्याचे दुसरे शतक हुकले. १३० चेंडूंचा सामना करताना त्याने आपल्या खेळीत १३ चौकार मारले. आठव्या कसोटीतील हे त्याचे चौथे अर्धशतक आहे. याशिवाय नूर अली जद्रानने ३१ तर इकराम अलीखिल आणि कैस अहमदने २१-२१ 1 धावा केल्या.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.