धावत्या ट्रेनसमोरून गायीनं मुलीला वाचवलं? चिमुकलीनं मृत्यूला दिला चकवा?

Truth Behind 7 Second Viral Train Clip: धावत्या ट्रेनसमोरून गायीनं मुलीला वाचवल्याचा व्हायरल व्हिडिओ खोटा असल्याचं समोर आलं आहे. सामच्या पडताळणीत हा व्हिडिओ AI च्या माध्यमातून तयार केल्याचं स्पष्ट झालं असून सोशल मीडियावर दिशाभूल केली जात आहे.
A viral video claiming a cow saved a girl from an oncoming train has been debunked as AI-generated.
A viral video claiming a cow saved a girl from an oncoming train has been debunked as AI-generated.saam tv
Published On

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही...या मुलीला गायीने वाचवलंय...एक सेकंद जरी उशीर झाला असता तर या मुलीला ट्रेननं उडवलं असतं...पण, गाय मदतीला धावून आली आणि या मुलीने मृत्यूलाच चकवा दिलाय...हा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होतोय...फक्त 7 सेकंदाचा हा व्हिडिओ आहे...पण, खरंच गायीनं या मुलीला वाचवलंय का...? 7 सेकंदाच्या पुढे काय घडलं...? ही घटना कुठली आहे...? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत...

आता हा व्हिडिओ पुन्हा एकदा पाहा...रेल्वे ट्रॅकच्या बाजूलाच ही मुलगी उभी आहे...आणि ट्रॅक शेजारी असलेल्या घरातून या मुलीचा व्हिडिओ कुणीतरी बनवत असल्याचं दिसतंय...मोटरमन जोरजोरात हॉर्न वाजवत असल्याचा आवाज येतोय...तरीदेखील चिमुरडी ट्रेल पटरीच्या बाजूलाच उभी असते...ट्रेन मुलीच्या जवळ येणार तेवढ्याच पांढऱ्या रंगाची गाय वेगानं धावत येते...आणि काही सेकंदात ती मुलीला बाजूला सारते...हे फक्त 2 ते 3 सेकंदात घडतं...आणि या मोठ्या अपघातातून मुलगी वाचते असा दावा केलाय...आणि ही ट्रेन वेगाने पुढे निघून जाते...व्हिडिओतील ट्रेन निळ्या रंगाची दिसतेय आणि फक्त तीनच डब्बे आहेत...ही ट्रेन नक्की आहे तरी कुठली...? हा व्हिडिओ कुठला आहे...? याची आम्ही पडताळणी सुरू केली...आमच्या टीमने या व्हिडिओमागचं सत्य जाणून घेतलं...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

गायीनं मुलीला वाचवल्याचा व्हिडिओ AI निर्मित

व्हिडिओतील निळ्या रंगाची फक्त 3 डब्यांचीच दाखवली

देशात 3 डब्ब्यांची ट्रेन कुठेही धावत नाही

AIच्या माध्यमातून व्हिडिओ बनवून दिशाभूल

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी भावनिक होत गायीनं मुलीला वाचवल्याचा दावा केला...अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला...AIचा व्हिडिओ बनवताना एवढी काळजी घेतलीय की कुणालाही या व्हिडिओवर संशय येणार नाही...मात्र, आम्ही या व्हिडिओची पडताळणी केली...त्यावेळी धावत्या ट्रेनसमोरून गायीनं मुलीला वाचवल्याचा दावा असत्य ठरलाय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com