
नवी दिल्ली : जगभरातील कंपन्या कर्मचाऱ्यांना वेगवेगळे आकर्षक पॅकेज, बोनस आणि ऑफर देत असतात. अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना बोनसमध्ये घर, कार, हिरे आणि रोख रक्कम दिल्याच्या बातम्या आतापर्यंत पाहिल्या असतील. अशाच पद्धतीच्या चीनमधील कंपनीच्या बोनसची जगभर चर्चा होत आहे.
चीनमधील एका कंपनीने जगावेगळी कृती करून सर्वांचं लक्ष वेधलं आहे. चीनमधील कंपनीने कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची अनोखी पद्धत शोधून काढली आहे. तुम्ही 15 मिनिटांत जेवढे पैसे मोजाल, तेवढी रक्कम कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून मिळेल, अशी ऑफर चीनमधील कंपनीने कर्मचाऱ्यांना दिली आहे.
चीनमधील क्रेन कंपनीने कर्मचाऱ्यांना जगावेगळी बोनस ऑफर दिली. कंपनीने एका टेबलावर ११ मिलियन डॉलर म्हणजे ७० कोटी रुपयांच्या नोटांचा ढीग ठेवला. टेबलावर तब्बल ७० कोटी रुपयांच्या नोटा ठेवल्यानंतर म्हटलं की, 'जितके पैसे मोजाल, तितके तेवढे तुमचे'. टेबलावरील बोनस वर्षभरासाठी असून ही ऑफर १५ मिनिटांसाठी असल्याचेही कंपनी कर्मचाऱ्यांना सांगायला विसरली नाही.
मीडिया रिपोर्टनुसार, हेनान मायनिंग क्रेन कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना ही अजब ऑफर दिली. 'टेबलावर नोटांचा ढीग ३६५ दिवसांचा बोनस आहे. तुम्ही जितके पैसे मोजाल, तितके पैसे तुमचे, असं कंपनीने जाहीर केलं. चीनमधील हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, 'एक मोठ्या टेबलावर ७० कोटी रुपये ठेवले आहेत. या टेबलावरील पैसे कर्मचारी मोजताना दिसत आहेत. एक व्यक्ती १५ मिनिटांत १०० K युआन म्हणजे १२.०७ लाख रुपये मोजण्यास यशस्वी झाला. अन्य कर्मचाऱ्यांनीही अनेक पैसे पदरात पाडून घेतले आहे. कंपनीच्या बोनस देण्याच्या अनोख्या पद्धतीने कर्मचारी भारावून गेले होते. टेबलावरील पेसै मोजताना त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. या व्हायरल व्हिडिओनंतर बोनसची अशी अनोखी पद्धती भारतातही राबवली जाणार का, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.