
Bride-Groom Viral News : सोशल मीडियावर अनेक नवीन ट्रेंड व्हायरल होत असतात. त्यातीलच एक म्हणजे लग्न , साखरपुडा आणि रिसेप्शन समारंभाला केक कापणे. केक कापल्यावर चेहऱ्याला केक लावण्याची पद्धतही आता सोशल मीडियावरील ट्रेंडमुळे सुरू झाली आहे. पण हाच ट्रेंड एका नवरदेवाच्या अंगलट आलाय. जिच्यावर प्रेम केलं. साताजन्माच्या गाठीही बांधल्या, पण एका ट्रेंडनं घात झाला. बायकोला राग आला आणि रिसेप्शन सोहळ्यातच घटस्फोट झाला.
केक तोंडाला फासल्यामुळं नवरीनं रिसेप्शनमध्येच घटस्फोट मागितला तर? आता म्हणाल काय पण काय राव! 'हलक्या दिलाच्या' लोकांना तर धक्काच बसेल. पण खरंच घडलंय हे. प्रँक नाही. नवरीनं रिसेप्शन सोहळ्यातच घटस्फोट मागितला. सेलिब्रेशन म्हणून कापलेला केक तोंडाला फासला म्हणून नवरी रागावली आणि रागाच्या भरात तिनं हा निर्णय घेतला.
सध्या लोक लग्नानंतर ग्रँड रिसेप्शन पार्टी ठेवतात. रिसेप्शन म्हटलं की धम्माल, मस्ती आणि मज्जा. हल्ली लग्नात केक कापण्याची पद्धतही सुरू झाली आहे. आपल्या लग्नाच्या सेलिब्रेशनचा केक कापणं कपलला महागात पडलं. नवरदेवाच्या एका चुकीमुळं घटस्फोटापर्यंत प्रकरण पोहोचलं.
मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना अमेरिकेतील आहे. बरीच वर्षे प्रेमप्रकरण सुरू होतं. दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. घरच्यांच्या परवानगीने त्यांनी लग्नही केले. रिसेप्शनही ठेवले. रिसेप्शनला नवीन आयुष्याची सुरुवात करायची असते. परंतु याच रिसेप्शनमध्ये यांनी घटस्फोट घ्यायचा निर्णय घेतला.
लग्न झाले. रिसेप्शनसाठी मोठा केक आणला. केक कापला त्यानंतर नवऱ्याने तो केक आपल्या बायकोच्या तोंडाला फासला. नव्या नवरीला राग आला आणि घटस्फोटच झाला. नवरीच्या म्हणण्यानुसार तिने आधीच नवऱ्याला सांगितले होते की, माझ्या तोंडाला केक लावू नकोस. परंतु त्याने तिचे काही ऐकलं नाही. तिचे तोंड त्या केकमध्ये बुडवले.
नवरीच्या म्हणण्यानुसार , तिला केकची अॅलर्जी आहे असं आधीच नवऱ्याला सांगितले होते. तोंडाला केक लावू नकोस असंही सांगितलं होतं. त्याने या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. त्याने माझे डोके मागच्या बाजूने पकडले आणि माझा चेहरा केकमध्ये बुडवला. ज्यामुळे खूप राग आला. या सर्व प्रकारानंतर सगळ्यांनाच धक्का बसला. मुलीच्या कुटुंबीयांनी आणि तिच्या मित्रांनी या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितले. परंतु ती महिला तिच्या निर्णयावर ठाम आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.