Mumbai Police Viral News : सलाम मुंबई पोलीस! अपघातग्रस्त महिलेला उचलून रुग्णालयात नेलं, अॅम्ब्युलन्सची वाट बघितली नाही

Mumbai Police News : मुंबई पोलीस दलात कार्यरत हवालदाराचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Mumbai Police Viral News
Mumbai Police Viral NewsSaam Tv
Published On

Mumbai Police Helps Elderly Woman Photo Goes Viral

मुंबई पोलीस! नुसतं नाव ऐकलं तरी गुन्हेगारांचे धाबे दणाणतात. तर सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळतो. गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ आणि नागरिकांसाठी रक्षक, अशी मुंबई पोलिसांची ख्याती आहे. अशीच प्रचिती एका घटनेनं आली आहे. मुंबई पोलीस दलात कार्यरत हवालदाराचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुंबई पोलीस दलाचं नाव अख्ख्या जगात गाजतं. गुन्हेगार कितीही 'शातिर' असला तरी, गुन्ह्याची उकल करून त्याच्या मुसक्या आवळणारच अशी गॅरंटीच! ही झाली एक बाजू. तर सर्वसामान्यांचं रक्षण, त्यांना मदत करण्यास तत्पर असणे ही दुसरी जमेची बाजू. असाच अनुभव नुकताच एका घटनेतून आला आहे.

Mumbai Police Viral News
Rahkeem Cornwall : हा तर इंजमाम उल हकपेक्षाही स्लो! क्रिकेट इतिहासातील सर्वात वजनदार खेळाडूच्या रन आउटचा मजेशीर Video व्हायरल

मुंबई पोलीस दलात कार्यरत हवालदार वाकचौरे यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात ते एका अपघातग्रस्त वृद्ध महिलेला उचलून घेऊन जाताना दिसत आहेत. ही महिला तिच्या पतीला भेटायला जात होती. त्याचवेळी भरधाव दुचाकीने धडक दिली.

या अपघातात ही वृद्ध महिला जखमी झाली. सुदैवाने घटनास्थळी हवालदार वाकचौरे कर्तव्यावर होते. त्यांनी तात्काळ धाव घेतली. महिला गंभीर जखमी झाली होती. त्यांनी अॅम्ब्युलन्सची वाट बघितली नाही. महिलेला उचलून घेत रुग्णालयात नेले. मुंबई पोलिसाच्या तत्परतेनं एका महिलेचे प्राण वाचले. संदीप वाकचौरेंच्या या कृतीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

हा फोटो मुंबई पोलिसांनी त्यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवरून पोस्ट केला आहे. 'सदैव ड्युटीवर! १६ ऑगस्ट रोजी पतीला भेटण्यासाठी दवाखान्यात जात असलेल्या ६२ वर्षीय महिलेला रस्ता ओलांडत असताना दुचाकीने धडक दिली. ड्युटीवर असलेले पोलीस कॉन्स्टेबल संदीप वाकचौरे तातडीने तिच्या मदतीला धावून गेले.

रुग्णवाहिकेची वाट न पाहता जवळच्या रुग्णालयात नेले आणि तिचा जीव वाचवला', असं कॅप्शन या फोटोला दिली आहे. यूजर्सनं वाकचौरेंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. 'मुंबई पोलिसांना सलाम', 'चांगल काम केलं आहे मुंबई पोलिसांनी' अशा कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com