Bride Haldi Dance Viral: हळदीत नवरीचा भन्नाट डान्स; माधुरीलाही लाजवेल अशा स्टेप्स, VIDEO व्हायरल

Haldi Dance Viral Video:सध्या सोशल मीडियावर एका तरुणीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे.
Bride Haldi Dance Viral
Bride Haldi Dance ViralSaam TV
Published On

Haldi Dance Viral Video: सोशल मीडियावर आजवर डान्सचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. लग्न म्हटल्यावर जंगी हळदी समारंभ आलाच. हळदी समारंभाला सर्वच जण बेफाम होत गाण्यांवर नाचतात. अशात सध्या सोशल मीडियावर एका तरुणीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तरुणीने आपल्याच हळदीत धडाकेबाज डान्स केला आहे. (Latest Marathi News)

पिवळी साडी, हिरवा चूडा, मोकळे केस आणि नाकात नथ घालून ही तरुणी डान्स करतेय. हळद लावून बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या "हमको आजकल है इंतजार" या गाण्यावर तरुणीने डान्स केला आहे. अगदी माधुरी प्रमाणे ती डान्स करत आहे. डान्स करताना तिच्या चेहऱ्यावर मोठा आनंद दिसतोय.

Bride Haldi Dance Viral
Manipur Viral Video Case: आमची ओळख उघड करू नका, मणिपूर अत्याचार पीडित महिलाची सुप्रीम कोर्टात धाव

आजकाल लग्नात नाचणाऱ्या नवरीचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेत. अशात आता आपलीच हळद गाजवणारी ही नवरी चांगलीच चर्चेत आलीये. @surbhihirnak या इंस्टग्राम अकाउंटवर व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. यावर चाहत्यांनी विविध कमेंट केल्यात.

एका युजरने यावर म्हटलं आहे की, तू तर माधुरी पेक्षाही भन्नाट नाचलीस. तर अन्य एकाने कमेंटमध्ये म्हटलंय की, ज्या मुलींना त्यांच्या आवडीचा जोडीदार मिळतो त्या अशाच पद्धतीने आनंद व्यक्त करतात.

Bride Haldi Dance Viral
Snake In Shirt Viral Video: तो शेतात बसला होता; अचानक शर्टात साप घुसला, काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com