Ganpati Song In Mumbai Local: धावत्या ट्रेनमध्ये तरुणाने गायलं "बाप्पा मोरया रे चरणी ठेवितो माथा"; व्हिडीओ व्हायरल

Bappa morya re Song Mumbai Local: धावत्या ट्रेनमध्ये बाप्पा मोरया रे चरणी ठेवितो माथा ...; गणरायाच्या गाण्यांनी मुंबईकर मंत्रमुग्ध, पाहा व्हिडीओ
Ganpati Song In Mumbai Local
Ganpati Song In Mumbai LocalSaam TV
Published On

Mumbai Local Ganpati Song Video Viral:

मुंबई लोकल ट्रेन म्हणजे मुंबईची लाइफलाईन. या मुंबई लोकलमध्ये रोजचा प्रवास करणारे प्रवासी आपलं एक कुटुंब ट्रेनमध्ये तयार करतात. रोजची येणारी जाणारी माणसं सर्व प्रकारचे सण ट्रेनमध्ये साजरे करतात. अशात मुंबई लोकलमध्ये गणपती बाप्पाची आरती आणि गाणी म्हणतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Latest Viral Video News)

Ganpati Song In Mumbai Local
Myra Vaikul Viral Video: 'आमच्या पप्पांनी गणपती आणला' म्हणत मायरा वायकुळने वाजत-गाजत आणला बाप्पा

ट्रेनमध्ये प्रवास करताना रोजच्या गर्दीचा सामना करावा लागतो. प्रत्येक मुंबईकर या गर्दीतून प्रवास करत घराकडची वाट पकडतो. अशात या धकाधकीच्या जीवनात सण उत्सव आले की सगळीकडे उत्साह पाहायला मिळतो. त्यामुळे मुंबईकर ट्रेनमध्ये आपला आनंद साजरा करतात.

कधी रोमँटिक तर कधी उडत्या चालीची गाणी गातात. सध्या गणेशोस्तव सुरू आहे. त्यामुळे मुंबई लोकल ट्रेनमध्ये काही प्रवासी गणरायाची आरती आणि गाणी गाताना दिसले आहेत.

"बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवितो माथा" गणरायाचं हे गाणं तुम्ही सर्वांनी नक्की ऐकलं असेल. साल 1993 मध्ये प्रसिद्ध गायक प्रल्हाद शिंदे यांनी आपल्या सुमधुर आवाजात हे गाणं गायलं आहे. त्याकाळी गायलेलं हे गाणं भरपूर गाजलं. प्रल्हाद शिंदे यांचा आवाज चाहते आणि भाविक आजही विसरले नाहीत. आजूनही हा आवाज आणि बाप्पाच्या गाण्याचे बोल भाविकांना मंत्रमुग्ध करतात.

@suhas_bandagale_19 या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या अकाऊंटवर ट्रेनमध्ये सादर केल्या जाणाऱ्या भजनाचे आणखीन काही व्हिडीओ व्हायरल झालेत. "आई माझी कोणाला पावली" हे गाणं देखील सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. नेटकरी या व्हिडीओवर भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत.

Ganpati Song In Mumbai Local
Dance Viral Video: 'नको मला बंगला, नको गाडी पाहिजे...'; मराठमोळ्या महिलेचा दुबईत हटके डान्स, व्हिडिओ पाहून तुम्ही म्हणाल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com