Andheri Cha Raja's Visarjan : बाप्पाच्या विसर्जनावेळी बोट पाण्यत उलटली अन् होत्याचं नव्हतं झालं; पाहा घटनेचा थरारक VIDEO

Boat Capsizes During Andheri Cha Raja's Visarjan : विसर्जन सुरू असताना गणपती बाप्पासह बोट पाण्यात उलटली होती. त्यामुळे येथील अनेक व्यक्ती पाण्यात पडल्या आणि त्यातील काहींना दुखापत झाली .
Boat Capsizes During Andheri Cha Raja's Visarjan
Andheri Cha Raja's Visarjan Saam TV
Published On

राज्यात काही ठिकाणी १० दिवसांच्या बाप्पाचे शनिवारी विसर्जन झाले. विसर्जनावेळी एक मोठी दुर्घटना घडली. अंधेरीचा राजाची मूर्ती असलेली बोट अचानक पाण्यात पलटली. त्यामुळे अनेक व्यक्ती समुद्राच्या पाण्यात पडल्या. काही गणेश भक्तांना यामध्ये दुखापत देखील झाली. या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, बाप्पासह भाविकांनी बोट घेऊन समुद्रात प्रवेश केला आहे. समुद्रात विसर्जनासाठी काही अंतरावर आल्यानंतर बोटीमधील वजन जास्त झाले. भार एका बाजूस जास्त आल्याने ती कलंडली आणि एका बाजून पाण्यात पडली. यावेळी बोटीसह बाप्पा आणि सर्वच भाविक पाण्यामध्ये पडले.

Boat Capsizes During Andheri Cha Raja's Visarjan
Bihar Boat Accident: शाळकरी मुलांनी भरलेली बोट नदीत उलटली; १६ चिमुकले बेपत्ता

पाण्यात पडल्यावर ज्या व्यक्तींना पोहता येत होतं ते झटपट पोहून पाण्याबाहेर समुद्रकिनारी पोहचले. मात्र यामध्ये अनेक व्यक्ती अशाही होत्या ज्यांना पोहता येत नव्हते. त्यामुळे या सर्वांचा जीव वाचवण्यासाठी अन्य लहान बोटी तेथे दाखल झाल्या आणि सर्वांना रेस्क्यू करण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

विसर्जनावेळी राज्यातील १५ जणांचा मृत्यू

गणेश विसर्जनावेळी या वर्षी राज्यातील तब्बल १५ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये गणपती विसर्जनाला गेलेल्या दोन युवकांचा वालदेवी नदीपात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. दोघेही मित्रांसोबत गणपती विसर्जनासाठी गेले असता नदीपात्रातील एका खड्यात पडल्याने त्यांचा जीव गेला आहे.

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथेही गणेश विसर्जनादरम्यान तीन जण वाहून गेले. मयूर गजानन ठाकरे, अमोल विनायक ठाकरे आणि राजेश संजय पवार अशी या व्यक्तींची नावे आहेत. अहमदनदरमध्ये २, जिंतूर आणि इंदापुरात प्रत्येकी १ अशी मृतांची आकडेवारी आहे.

Boat Capsizes During Andheri Cha Raja's Visarjan
Ujani Boat Accident : उजनी धरणात बुडालेल्या ६ पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले; पोलिसांकडून ओळख पटवणे सुरू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com