Bihar Boat Accident: शाळकरी मुलांनी भरलेली बोट नदीत उलटली; १६ चिमुकले बेपत्ता

Children Missing Bagmati River: सदर घटनेची माहिती मिळताच शोध आणि बचावकार्यास सुरूवात झाली आहे.
Bihar Boat Accident
Bihar Boat AccidentSaam TV

Muzaffarpur Boat Tragedy Accident:

बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये नदीत लहान मुलांनी भरलेली बोट उलटली आहे. या दुर्घटनेत २० मुलांना वाचवण्यात यश आलं असून अद्यापही १६ हून आधिक मुलं बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती मिळालीये. सदर घटनेची माहिती मिळताच शोध आणि बचावकार्यास सुरूवात झाली आहे.

Bihar Boat Accident
Rajashtan Accident : देवदर्शनाची इच्छा अपूर्णच राहिली, राजस्थानमध्ये भीषण बस अपघातात ११ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गायघाट येथील बेनियाबाद ओपी परिसरातील मधुपट्टी घाटात ही बोट पलटी झाली. बोटीतून सुमारे ३३ लहान मुलं प्रवास करत होते. शाळकरी मुलांची बोट नदीत पलटल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. नदीमधील पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने बोट बुडाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. बेपत्ता मुलांचा शोध घेण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

Bihar Boat Accident
Pune Crime News: खळबळजनक! पार्लरमधील नोकरीचं आमिष दाखवून बांगलादेशी अल्पवयीन मुलीची बुधवार पेठेत विक्री

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com